Breaking

Thursday, July 7, 2022

न्यायालयाचा एसटी महामंडळाला धक्का; थेट एसटीबस केली जप्त https://ift.tt/CjIYmuM

: अपघातातील जखमीस नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केल्या प्रकरणी सांगली न्यायालयाने एसटी परिवहन महामंडळाला दणका दिला आहे. भरपाईसाठी थेट सांगली आगाराची एसटी जप्त केली आहे. नुकसान भरपाई आदेश देऊन देखील, एसटी महामंडळाकडून ती देण्यास टाळाटाळ होत असल्याने,सांगली न्यायालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. (the has been confiscated by the court) तासगाव तालुक्यातल्या कवठेएकंद येथे जानेवारी २०१३ साली एसटीची धडक बसून एक दुचाकीचा अपघात झाला होता. या अपघातात सातारा जिल्ह्यातील शनिवारी येथील सैफन तांबोळी हे जखमी झाले होता. यामध्ये सैफन तांबोळी यांचा हात फ्रॅक्चर झाला होता. काही कामानिमित्ताने सैफन तांबोळी हे सांगली जिल्ह्यात आले होते. तासगाव रोडवरून जात असताना कवठेएकंद येथे सांगली आगाराची एमएच- 12 बीटी 4856 क्रमांक बसने सैफन तांबोळी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला होता. क्लिक करा आणि वाचा- या प्रकरणी सैफन तांबोळी यांनी वकील आर. एम. क्षीरसागर यांच्या माध्यमातून सांगली न्यायालयामध्ये नुकसान भरपाईसाठी याचिका दाखल केली होती. या वर्षी (२०२२) या प्रकरणी सांगली न्यायालयाने एसटी महामंडळाला, तांबोळी यांना नुकसान भरपाई देण्याबाबतचे आदेश दिले होते. मात्र आदेश देऊन देखील एसटी महामंडळाकडून तांबोळी यांना नुकसान भरपाई देण्यामध्ये टाळाटाळ करण्यात येत होती. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, एसटी महामंडळाकडून होणारया टाळाटाळ बाबत तांबोळी यांनी न्यायालयाकडे पुन्हा धाव घेतली असता, सांगली न्यायालयाने तांबोळी यांच्या नुकसान भरपाईच्या वसुलीसाठी थेट सांगली एसटी आगाराची करण्याचे आदेश दिले, त्यानुसार हेडबेलीप एस .के. देशमुख यांनी ज्या एसटी बसने तांबोळी यांचा अपघात झाला होता, तीच बस सांगली एसटी आगारातून जप्त करत, न्यायालयाच्या आवारात आणून लावली आहे, अशी माहिती अ‍ॅड.आर.एम. क्षीरसागर यांनी दिली आहे. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान,अपघातानंतर हात संपूर्ण निकामा झाल्याने तक्रारदार सैफन तांबोळी यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार एसटी महामंडळाने आपणास नुकसान भरपाई द्यावी,अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/KfutNLY

No comments:

Post a Comment