Breaking

Thursday, July 7, 2022

किरीट सोमय्यांचं उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त ट्विट, शिंदे गटाचे आमदार संतापले, फडणवीसांकडे तक्रार https://ift.tt/IZSKmaY

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात सातत्यानं आवाज उठणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सत्तांतरानंतर देखील उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका सुरु ठेवलीय. किरीट सोमय्या यांनी त्यांचा मुलगा नील सोमय्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो ट्विटरवर पोस्ट करताना किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंसाठी माफिया या शब्दाचा वापर केला. किरीट सोमय्या यांनी ट्विटमधील शब्दावर ठाम असल्याची भूमिका माध्यमांशी बोलताना मांडली. तर, एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. किरीट सोमय्यांच्या वक्तव्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत कळवलं असून ते सोमय्यांशी बोलतील, असं केसरकर म्हणाले. किरीट सोमय्याचं ट्विट किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला. त्यासोबत 'या मंत्रालयात आज 'रिक्षावाला' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्री ना हटविल्या बदल अभिनंदन केले, असं ट्विट केलं. या ट्विटमध्ये किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंसाठी माफिया असा शब्द वापरला. मात्र, किरीट सोमय्या त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. किरीट सोमय्यांची भूमिका मी एकनाथ शिंदेंना भेटलो त्यांचं अभिनंदन केलं. जे सरकार ज्या पद्धतीनं या सरकारमधले काही लोकांच्या डोक्यात सत्तेचा माज गेला होता. ते ज्या प्रकारे सत्तेचा गैरवापर करत होते ती माफियागिरी आहे. मनसूख हिरेनची हत्या केली गेली, त्याचं कुटुंब माफियाचं म्हणेल, असं किरीट सोमय्या म्हणाले. संजय राऊत, उद्धव ठाकरेंनी मला कशा प्रकारची भाषा वापरली होती. माझ्या विरोधात पोलिसांचा वापर करण्यात आला. नवनीत राणा रवी राणा यांच्याबद्दल सरकार कसं वागलं होतं, असा सवाल किरीट सोमय्यांनी केला. दीपक केसरकर संतापले आम्ही ज्यावेळी मुंबईत परत आलो तेव्हा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सर्व आमदार यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार यांची बैठक झाली. देवेंद्र फडणवीस त्या बैठकीत उपस्थित होते. त्या बैठकीत आमच्या नेत्यांबद्दल, उद्धव ठाकरेंबद्दल वक्तव्य करण्यात येऊ नये अशी मी विनंती केली होती, असं दीपक केसरकर म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी ती विनंती मान्य केली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांना आपल्या समक्ष याबाबत सांगितलं होतं.ज्येष्ठ नेत्यांबद्दल कोणतही वक्तव्य काढू नये, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. मी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. तर, देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर हे घातलं होतं. किरीट सोमय्या हे भाजपचे नेते असल्यानं देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी बोलतील, असं दीपक केसरकर म्हणाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/T97Kpgc

No comments:

Post a Comment