Breaking

Tuesday, July 5, 2022

"१९ तारखेला राऊतांच्या भाषणानंतर सर्व आमदारांनी हात पुढे करुन शपथ घेतली की..." https://ift.tt/E9lyWX7

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड करणारे शिवसेना आमदार यांनी शिवसेना नेते सुभाष देसाई, यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. "१९ तारखेला संजय राऊत यांच्या भाषणानंतर सर्व आमदारांनी हात पुढे करुन शपथ घेतली की, आता उठाव झाला पाहिजे" अशी माहिती यांनी दिली. रमेश बोरणारे काय म्हणाले? "१९ तारखेला आपल्या सर्वांचे नेते संजय राऊत यांच्या भाषणानंतर, गेल्या अडीच वर्षात ज्या ज्या आमदारांच्या विरोधात अन्याय झाला, त्या सर्व आमदारांनी उठाव करण्याचा निर्णय घेतला. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार बहुमताने निवडून आले. मतदान झाल्यानंतर सर्व आमदारांनी हात पुढे करुन शपथ घेतली, की आता उठाव झाला पाहिजे. उद्धव ठाकरे म्हणजे देवमाणूस, परंतु देव बडव्यांच्या ताब्यात गेला की काय होतं याचं चित्र पाहिलं." अशी व्यथा रमेश बोरणारेंनी सांगितली. "संजय राऊत यांनी काय शब्द वापरले आमच्याबद्दल, तर ४० रेडे पाठवले देवीला, आमच्यात ४ महिला आमदार आहेत, गुवाहाटीला वेश्या पाठवल्या म्हणे, हा विचार बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात कोणी करत असेल तर उठाव झाल्याशिवाय राहणार नाही" असंही बोरणारे म्हणाले. सुभाष देसाईंवर आगपाखड "पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मी आमचे प्रश्न घेऊन गेलो होतो. पाच गावांचा प्रश्न होता, बारा लाख रुपये खर्च येईल असं सांगितलं, पण जसा एखादा सामान्य माणूस काम करतो, तसं मला म्हणाले ते गेट आउट म्हणाले होते. ही पद्धत. कोणाला सांगायचं मी? मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख वेगवेगळे असते तर पक्षप्रमुखाकडे मी पालकमंत्र्यांची तक्रार केली असती. परंतु ऐकायलाच कोणी तयार नाही. मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख एकच असल्याने मी कुणाकडे दाद मागायची?" असा सवाल बोरणारेंनी विचारला. "मी तुमच्यासारखा विधानपरिषदेचा आमदार नाही झालो, एक लाख लोकांनी मला मतदान केलं, की रमेश बोरणारे माझं काम करणार आहे, जर मी पाचही गावांचं काम केलं नाही, तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही" असंही बोरणारे म्हणाले. हेही वाचा : वैजापुरात शक्तिप्रदर्शन शिवसेनेशी बंडखोरी करून शिंदे गटात सामील झालेले आमदार रमेश बोरणारे आज वैजापूर येथे दाखल झाले. मोठ्या जल्लोषात हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करून शहरात रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. विशेष म्हणजे या जल्लोषात शिवसेनेचे अनेक स्थानिक पदाधिकारी हजर होते. वैजापूर तालुक्याचे शिवसेनेचे आमदार रमेश बोरणारे बंडखोरी करून शिंदे गटात सामील झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते शिंदे यांच्या सोबत होते. सरकारने विश्वास दर्शक ठराव पास केल्या नंतर आज सकाळी केंद्रीय बलाच्या संरक्षणात वैजापूर येथे दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते भगवे फेटे घालून त्यांची प्रतीक्षा करीत होते. बोरणारे वैजपुरात दाखल होताच कार्यकर्त्यांनी जय भवानी जय शिवाजी च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. बोरणारे यांच्या वाहनांच्या मागे एक नंतर एक शेकडो वाहने जोडत गेली आणि त्यांचा वैजापूर प्रवेश वाहन रॅलीत बदलले. बोरणारे यांनी शहरातील विविध चौकात महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन केले. हेही वाचा : अनपेक्षित जल्लोष आणि उत्साह बोरणारे यांनी जेव्हा बंडखोरी केली त्या वेळी उघडपणे त्यांच्यासोबत बोटांवर मोजण्या इतपत समर्थक होते. दरम्यान शिवसेने वैजपुरात शिवसैनिकांचा मोठा कार्यक्रम घेतला होता. त्यामुळे बोरणारे यांना स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना बळ मिळणार नाही अशीच अपेक्षा शिवसेना आणि राजकीय वर्तुळातून व्यक्त होत होती. मात्र सत्तास्थापनेच्या घडामोडीनंतर आज जेव्हा आमदार बोरणारे वैजपुरात दाखल झाले तेव्हा चित्र वेगळेच होते. शिवसेनेच्या कार्यक्रमात हजेरी लावणारे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी बोरणारेंच्या स्वागताला उपस्थित असल्याचे दिसून आले. हेही वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/1HkZVQl

No comments:

Post a Comment