पाटणा : पंतप्रधान यांनी राजदचे प्रमुख नेते यांच्याशी फोनवर चर्चा केली. नरेंद्र मोदीयांनी राजदचे अध्यक्ष यांच्या प्रकृतीची विचारणा केली. लालूप्रसाद यादव यांची प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी, अशी इच्छा नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. तेजस्वी यादव यांच्या निकटवर्तीयांनी ही माहिती दिली आहे. भाजपच प्रमुख नेते राज्यसभा खासदार सुशीलकुमार मोदी यांनी बिहारच्या सरकारला लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या उपचार करण्यासाठी दिल्लीतील रुग्णालयात दाखल करावं लागल्यास बिहार सरकारनं त्यासाठी तातडीनं प्रयत्न करावेत, अशा सूचना सुशीलकुमार मोदी यांनी दिल्या आहेत. माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीत वेगानं सुधारणा होऊन ते घरी परतावेत, प्रार्थना सुशीलकुमार मोदी यांनी केली आहे. लालूप्रसाद यादव यांना सोमवारी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. घरामध्ये पडल्यानं त्यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. लालूप्रसाद यादव यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. लालू प्रसाद यादव यांना प्रकृतीच्या इतर समस्या देखील आहेत. लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी सरकारी निवासस्थानात वास्तव्यास आहेत. पायऱ्यांवरुन पडल्यानं त्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. लालूप्रसाद यादव यांना डॉक्टरांनी दोन महिने आराम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लालूप्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट लिहून वडिलांचे फोटो पोस्ट केले आहेत. त्या फोटोंमध्ये लालूप्रसाद यादव रुग्णालयात असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं दिसतं. रोहिणी यांनी वडील एका हिरो प्रमाण आहेत, ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करत असल्याचं म्हटलं. लालूप्रसाद यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ZKvnbUw
No comments:
Post a Comment