दापोली : 'होय मला गेल्या अडीच वर्षात केवळ त्रासच दिला. शिवसेनेला आणि योगेश कदमला संपवण्यासाठीच निवडणुकीत पराभूत झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदाराला आमच्याच शिवसेनेचे पालकमंत्री बळ देत होते. याबाबत अनेकदा याबाबत सांगूनही मातोश्रीवरील चार जणांचे कोंडाळे ही माहिती पक्षप्रमुखांकडे पोहोचू देत नव्हते, असा खळबळजनक आरोप आमदार यांनी दापोलीत पत्रकारांजवळ बोलताना केला. () आज आमदार योगेश रामदास कदम यांचे मतदारसंघात भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. तसेच कार्यकर्त्यांनी जल्लोषात खेड, दापोली आणि मंडणगड या तीनही तालुक्यांमध्ये मिरवणूक काढली. यावेळी त्यांनी दापोली येथे पत्रकरांशी संवाद साधला. क्लिक करा आणि वाचा- जिल्हा नियोजनमधून पालकमंत्री अनिल परब राष्ट्रवादीच्या पडलेल्या आमदारांना निधी देत असत. माझी मात्र पद्धतशीरपणे गळचेपी सुरू होती. दापोली मंडणगड नगरपंचायत निवडणुकीतही राष्ट्रवादीत चाललेल्या गद्दारांना हाताशी धरून त्यांना पदांची खिरापत दिली. राष्ट्रवादीतून आलेल्यांना एक दिवसात शिवसेनेची उमेदवारी दिली गेली. पण यातून शिवसेनेला काहीच मिळाले नाही. शिवसेना संपवण्यासाठी काहींनी सुपारीच घेतली होती आणि म्हणूनच आपण हा निर्णय घेतला. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आजही आपल्याला नितांत आदर असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. क्लिक करा आणि वाचा- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी काही महिन्यांपूर्वीच पत्रकार परिषदेत अनिल परब यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. अनिल परब हे शिवसेना संपवायला निघालेत, असेही रामदास कदम म्हणाले होते. त्यानंतर शिंदेंनी केलेल्या बंडानंतर शिंदेंसोबत गेलेल्या या गटात आमदार योगेश कदम हेही होते. आता योगेश कदम यांनीही पुन्हा अनिल परब यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. मी गुवाहाटीला पळून गेलेलो नाही. मी तेथे जातोय याची कल्पना शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना दिली आणि मगच मी तिकडून निघालो असाही गौप्यस्फोट आमदार योगेश कदम यांनी केला. पालकमंत्री अनिल परब यांच्या घाणेरड्या राजकारणाला कंटाळून मी एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. मी एकनाथ शिंदे गटात सामील होताना शिवसेना नेते रामदास कदम यांना देखील सांगितलं होतं. तिथे गेल्यानंतर देखील मी वडील या नात्याने रामदास कदम यांच्या संपर्कात होतो. रामदास कदम या साऱ्या राजकीय घडामोडीत मला सल्ले देत होते, असेही ते म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर माझ्यासह अनेक आमदार पुढचे चार-पाच दिवस झोपलेले नाहीत. कदम कुटुंबीयांना देखील तो दिवस दुःखाचा होता. अनिल परब माझ्या मतदारसंघात मी पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करत होते. या उमेदवाराने गेली सहावर्षे शिवसेनेच्या विरोधात काम केले व विरोधात काम करण्यासाठी गेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महिलांनाही डांबून ठेवले पण त्या ऐकल्या नाहीत. या रणरागिणी आजही शिवसेनेबरोबच आहेत आणि अशा शिवसेनाविरोधी कारस्थान करणाऱ्यांना पालकमंत्री अनिल परब बळ देत होते. पण आम्ही शिवसेनेचा भगवा कधीही सोडला नाही सोडणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/UAcK0p3
No comments:
Post a Comment