Breaking

Saturday, July 9, 2022

सुन्न करणारी घटना! आईची हत्या करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न https://ift.tt/g2QZbrh

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई मुलुंडच्या पश्चिमेकडे असलेल्या वर्धमाननगर येथे राहणाऱ्या एका ४७ वर्षीय महिलेची तिच्या मुलाने हत्या केली. त्यानंतर या मुलाने रेल्वेखाली जीव देऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. छाया पांचाळ असे मृत महिलेचे नाव आहे. (The by killing his mother in Mumbai) वर्धमान नगरातील फ्लॅट क्रमांक १०२ मधून रक्त वाहत असल्याचे येथील रहिवाशांच्या लक्षात आले. यानंतर या रहिवाशांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. ही माहीती मिळताच पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कोंथीबिरे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांना छाया पांचाळ ही रक्ताच्या थोराळ्यात पडलेली आढळली. तिची चाकूने गळा चिरून हत्या करण्यात आली होती. क्लिक करा आणि वाचा- पोलिसांनी रहिवाशांकडून तिच्या पतीचा मोबाइल क्रमांक घेऊन संपर्क केला. त्यांनी आपण राजावाडी रूग्णालयात असल्याचे सांगितले. मुलाचा रेल्वेच्या धडकेमुळे अपघात झाल्यामुळे रूग्णालयात असल्याचेही तो म्हणाला. पोलिसांनी घराची झडती घेतली असता चाकू आणि एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये छाया यांचा मुलगा जयेश याने आपणच करून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले होते. क्लिक करा आणि वाचा- छाया यांच्या पतीला घरी बोलावून चिठ्ठी दाखवली असता जयेश याने लिहीली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या जयेशला राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वडिलोपार्जित संपत्तीच्या वादातून दोघेही तणावाखाली होते आणि त्यातूनच हा प्रकार घडला असावा असा अंदाज छाया यांच्या पतीने व्यक्त केला असून पोलिस याबाबत तपास करीत आहेत. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/FNgyMLP

No comments:

Post a Comment