Breaking

Saturday, July 9, 2022

गोतबाया राजपक्षेंची राजीनाम्याची तयारी, पंतप्रधान विक्रमसिंघेंचं घर पेटवलं, पाहा व्हिडिओ https://ift.tt/GEteNz5

कोलंबो : श्रीलंकेतील अर्थव्यवस्था डबघाईला आल्यामुळं त्रस्त असलेल्या जनतेनं आज राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर कब्जा केला. मोठ्या संख्येनं आंदोलक निवासस्थानी पोहोचण्यापूर्वी राष्ट्रपती राजपक्षे निवासस्थान सोडून पळून गेले होते. आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानावर ताबा मिळवल्यानंतर गोतबाया राजपक्षे आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आंदोलकांनी रानिल विक्रमसिंघे यांचं खासगी निवासस्थान पेटवून दिलं आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीचार्ज आणि अश्रू धुराच्या कांड्या फोडल्या. आंदोलकांवर पाण्याचा मारा देखील करण्यात आला. राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांनी देखील त्यांच्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. गोतबाया राजपक्षेंचा राजीनामा पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांवर हल्ला केला. त्यामुळं आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी पंतप्रधानांच्या खासगी निवासस्थानाला आग लावली. पंतप्रधानांच्या वाहनाचं देखील नुकसान करण्यात आलं आहे. रानिल विक्रमसिंघे यांच्या पाठोपाठ गोतबाया राजपक्षे यांनी देखील राष्ट्रपती पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. गोतबाया राजपक्षेंनी १३ जुलै रोजी राजीनामा देणार असल्याचं कळवल्याची माहिती महिंदा यापा अभयवर्धने यांनी दिली आहे. राजपक्षेंच्या राजीनाम्यानंतर पुढील सात दिवसात प्रभारी राष्ट्रपतींची निवड केली जाणार आहे. रानिल विक्रमसिंघेंचा राजीनामा श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांच्या घरी झालेल्या बैठकीत राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना हटवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यानंतर गोतबाया राजपक्षे आणि रानिल विक्रमसिंघे राजीनामा देण्यास तयार झाले. यावर महिंदा यापा अभवयवर्धने अंतिम निर्णय घेणार आहेत. अखेर रानिल विक्रसिंघे यांनी राजीनामा दिला. देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वपक्षीय बैठकीतील नेत्यांची मागणी मान्य करत असून राजीनामा देत असल्याचं म्हणत रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिला. गोतबाया राजपक्षेंनी शुक्रवारीच निवास्थान सोडलेलं श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवासस्थानी आज सकाळी मोठ्या संख्येनं आंदोलक घुसले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोतबाया राजपक्षे यांना यासंदर्भात माहिती मिळाली होती. राजपक्षेंना शुक्रवारी निवासस्थान सोडून एका अज्ञात ठिकाणी पोहोचवण्यात आलं होतं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/sNUnQfy

No comments:

Post a Comment