अंबरनाथ : चिखलोली धरणात मित्रांसह पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (३०) असे या तरुणाचे नाव असून तो अंबरनाथमध्ये राहणारा होता, अशी माहिती कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दला कडून देण्यात आली. (Young man drowns in ) अंबरनाथच्या चिखलोली पावलेला हा तरुण अंबरनाथ पूर्वेतील कानसई गाव परिसरात वास्तव्याला होता. शुक्रवारी विवेकची सुट्टी असल्याने तो चिखलोली धरणावर मित्रांसोबत फिरण्यासाठी गेला होता. तिथे जेवण झाल्यानंतर हात धुण्यासाठी तो पाण्याजवळ गेला असता त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला आणि पाण्यात बुडून बेपत्ता झाला. यानंतर शुक्रवारी रात्रीपर्यंत अग्निशमन दलाने त्याचा धरणात शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. त्यामुळे शनिवारी पुन्हा एकदा अग्निशमन दल, प्रोफेशनल स्वीमर्स आणि या तरुणाच्या मित्रांनी संयुक्तपणे त्याचा धरणाच्या पाण्यात शोध घेतला असता विवेकचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. क्लिक करा आणि वाचा- शुक्रवारी (८) जुलै रोजी संध्याकाळी विवेक भोईर मित्रांसह चिखलोली धरणावर गेला होता. तेथे तो पाण्यात उतरला मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. संध्याकाळी ६ वा च्या सुमारास याबाबत माहिती मिळताच बदलापूर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने आणि विवेकच्या मित्रांनी विवेकचा शोध घेण्यास सुरुवात केली. क्लिक करा आणि वाचा- मात्र, रात्री ९ वाजेपर्यंत त्याचा काहीच थांगपत्ता न लागल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली, त्यानंतर आज शनिवारी (९) रोजी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू करण्यात आले. आणि दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विवेकचा मृतदेह हाती लागल्याची माहिती अग्निशमन दल यांच्या कडून देण्यात आली. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/peovlE7
No comments:
Post a Comment