बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना एजबॅस्टन येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने दिलेल्या १७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गोलंदाजांनी आपल्या धमाकेदार कामगिरीसमोर इंग्लंड फलंदाजांची चांगलीच दमछाक उडाली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने हा सलग १४ वा सामना जिंकला आहे. इंग्लंडची फलंदाजी गडगडली प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने इंग्लंडसमोर विजयासाठी १७१ धावांचे लक्ष्य ठेवले. रवींद्र जडेजाने २९ चेंडूंत पांच चौकारांच्या मदतीने ४६ धावांची नाबाद खेळी करत टीम इंडियाची लाज वाचवली. प्रत्युत्तरात इंग्लंडचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर तळ ठोकून फलंदाजी करू शकला नाही आणि षटकांत १२१ धावाच करू शकला. परिणामी भारताने ४९ धावांनी विजय मिळवून सामन्यासह मालिका खिशात घातली.यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. वाचा - इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक ३५ आणि डेव्हिड विलीने नाबाद ३३ धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमारने तीन तर जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी दोन बळी घेतले. इंग्लंडवर भारताचा हा सलग चौथा टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका विजय ठरला, ज्यात २०१८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २-१ ने जिंकलेला आणि दोन घरच्या मालिका विजयाचा समावेश आहे. विराट कोहली आणि ऋषभ पंत यांच्यासारख्या आक्रमक फलंदाजानासाठी दीपक हुडा आणि ईशान किशन यांना डावलले गेल्याने भारताच्या दुसऱ्या टी-२० सामन्याच्या संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र, इंग्लडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहित ब्रिगेडने येताच इंग्लंड गोलंदाजानावर जोरदार मारा सुरु केला. वाचा - भारताच्या मदतीला 'सर' जडेजा सरसावले तत्पूर्वी, टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडसमोर विजयासाठी १७१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. रवींद्र जडेजाने २९ चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने ४६ धावांची नाबाद खेळी करत टीम इंडियाची लाज वाचवली. ऋषभ पंतने कर्णधार रोहित शर्मासोबत भारतीय डावाची सुरुवात केली. दोन्ही खेळाडूंनी टीम इंडियाला झंझावाती सुरुवात करून दिली, पण इंग्लंडकडून पदार्पण करणाऱ्या रिचर्ड ग्लीसनने रोहित (३१), कोहली (१) आणि पंत (२६) यांना बाद करून इंग्लंडला सामन्यात पुनरागमन करून दिले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/azi1ZBm
No comments:
Post a Comment