: एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला एका मुजोर कारचालकाने बोनेटवरून फरफटत नेल्याची घटना नवी मुंबईतील येथे घडली आहे. वाहनातील एका प्रवाशाने ही घटना आपल्या मोबाईल फोनमध्ये चित्रित केली. हा धक्कादायक प्रकार खोरघरमधील कोपरा उड्डाणपुलाजवळ घडला. (a hit a police officer and dragged him on a bonnet) हा बेशिस्त विरुद्ध दिशेने कार चालवत होता. तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने या कारला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुजोर कारचालकाने कार थांबवली नाही. त्याने आपली कार तशीच सुरू ठेवत पोलीस कर्मचाऱ्याला ठोकरले. त्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याला कारचालकाने बोनेटवरून सुमारे १०० मीटर फरफटत नेले. क्लिक करा आणि वाचा- कोपरा उड्डाणपुलाजवळ हा प्रकार घडल्यानंतर आजूबाजूचे वाहनचालक आणि नागरिक हा घडलेला प्रकार पाहिला. त्यानंतर काही वाहनधारक त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीला धावले. पोलीस कर्मचाऱ्याला बोनेटवरून फरफटत नेले जात असताना जवळच्याच एका वाहनातील व्यक्तीने आपल्या मोबाईलच्या सहाय्याने ही घटना कैद केली. इतर वाहनचालकांनी पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेणाऱ्या कारचालकाला थांबवले. क्लिक करा आणि वाचा- कारचालकाने आपली कार थांबवल्यानंतर फरफटत गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने मुजोर कारचालकाच्या कारची किल्ली काढून घेतली. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/OQcD69w
No comments:
Post a Comment