Breaking

Friday, July 29, 2022

सेना फोडूनही हात रिकामेच, ठाकरे परिवाराच्या विरोधात गरळ ओकणाऱ्यांना किती किंमत द्यायची : संजय राऊत https://ift.tt/H9jltcK

मुंबई : महाराष्ट्रात सत्तांतर होऊन एक महिना पूर्ण होत आहे. राज्यातील सत्तांतर होण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेलं बंड कारणीभूत ठरलं. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांकडून महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्यासाठी विविध कारणं देण्यात येत होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटातील आमदार भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवर होणाऱ्या टीकेला विरोध करत होते. तेच एकनाथ शिंदे समर्थक आमदार आणि इतर नेते आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. बंडखोर आमदारांच्या निशाण्यावर सुरुवातीला संजय राऊत होते. आता थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरचं टीका केली जात असल्यानं शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सत्ता मिळवूनही त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेय, अशी टीका संजय राऊतांनी ठाकरेंवर टीका करणाऱ्या बंडखोर नेत्यांवर केली आहे. संजय राऊत काय म्हणाले? राजकारण इतक्या खालच्या स्तराला कधीच गेले नव्हते. सत्याची कास धरणारा महाराष्ट्र ही ओळख पुसून टाकली जात आहे. शिवसेना फोडूनही ज्यांचे हात रिकामेच राहिले ते शिवसेना व ठाकरे परिवाराच्या विरोधात गरळ ओकत आहेत. सत्ता मिळवूनही ज्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे त्यांना किती किंमत द्यायची? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राची ओळख पुसली जातेय महाराष्ट्र राज्यानं आतापर्यंत सत्याची कास धरली होती. राज्याची देखील तिच ओळख होती. मात्र, आता राजकारण इतक्या खालच्या स्तराला कधीचं गेलं नव्हतं. सत्याची कास धरणारा महाराष्ट्र ही ओळख पुसण्याचा प्रयत्न केला जातोय. उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्यांवर संजय राऊत भडकले महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुरु झाल्यानंतर २१ जूनपासून एकनाथ शिंदे गटाकडून किंवा शिंदे गटातील नेत्यांकडून शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात नव्हती. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोर नेत्यांविरोधात घेण्यात आलेली ठाम भूमिका, एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांवरील हकालपट्टीची कारवाई यातून दोन्ही नेत्यांचे पुन्हा एकत्र येण्याचे दोर कापले गेले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांच्या विरोधात भूमिका घेणारे एकनाथ शिंदे गटातील नेते आता थेट उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत. एकेकाळी शिवसेनेत राहिलेले रामदास कदम, दीपक केसरकर, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई यांच्यासारख्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवर टीका केली जातेय. त्यामुळं शिवसेा खासदार संजय राऊत यांनी शिवसेना फोडूनही ज्यांचे हात रिकामेच राहिले ते शिवसेना आणि ठाकरे परिवाराच्या विरोधात गरळ अकत असल्याची टीका केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/fNUSBlk

No comments:

Post a Comment