Breaking

Saturday, July 2, 2022

म्हणून एकनाथ शिंदेंकडे आजही आहे टेम्पो; कित्येक वर्षांपासून ठेवलाय जपून https://ift.tt/ICTiBzu

ठाणे: हिंदुत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्यानं शिंदे मुख्यमंत्री झाले. ठाणे जिल्ह्यातील बडे नेते अशी शिंदेंची ओळख आहे. जिल्ह्यावर त्यांची प्रचंड पकड आहे. प्रशासनाची त्यांना उत्तम जाण आहे. साताऱ्याहून उदरनिर्वाहासाठी शिंदे ठाण्यात आले. सुरुवातीच्या काळात ते ठाण्यात टेम्पो चालवायचे. तो टेम्पो आजही शिंदे यांच्याकडे आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीआधी शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे त्यांच्या संपत्तीची माहिती दिली. त्या शपथपत्रात टेम्पोचादेखील उल्लेख होता. हा टेम्पो शिंदे यांच्या पत्नीच्या नावे आहे. गाव सोडून शहरात आल्यावर शिंदेंसमोर रोजीरोटीचा प्रश्न होता. हातातोंडाची गाठ पडावी यासाठी शिंदे त्यांच्या उमेदीच्या काळात टेम्पो चालवायचे. या टेम्पोमुळे शिंदे यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटला. यानंतर शिंदे शिवसेनेत सक्रिय झाले. ठाण्यातील तेव्हाचे शिवसेनेचे लोकप्रिय नेते आनंद दिघेंनी शिंदेंना संधी दिली. त्यानंतर शिंदे यांची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. २०१९ मध्ये शिंदेंनी निवडणूक आयोगाला त्यांच्या संपत्तीचा तपशील दिला. त्यात टेम्पोचा उल्लेख आहे. यासोबतच शिंदेंच्या पत्नीकडे महिंद्राची आरमाडा आहे. तर शिंदेंच्या नावावर इनोव्हा आणि स्कॉर्पियो कार आहेत. दांडगा जनसंपर्क असलेला नेता अशी शिंदे यांची ओळख आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/VunxBP1

No comments:

Post a Comment