Breaking

Friday, July 1, 2022

दे दणादण... रिषभ पंतने तुफानी फलंदाजी करत केली इंग्लंडची धुलाई, भारताचा धावांचा डोंगर https://ift.tt/PblUTF3

बर्मिंगहॅम : आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव असतो हे ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या क्रिकेट कसोटीत दाखवून दिले. पंतच्या या शतकी प्रतिकारामुळे भारताने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या क्रिकेट कसोटीत पहिल्या दिवसअखेर खराब सुरुवातीनंतर ७ बाद ३३८ अशी मजल मारली. पंतने यावेळी १११ चेंडूंत १९ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर १४६ धावांंची तुफानी खेळी साकारली. जो रुटला मोठा फटका मारण्याच्या नादात पंत यावेळी बाद झाला. पंतने यावेळी ८९ चेंडूंत शतक साकारले. या मैदानातील गेल्या १२० वर्षांतील हे सर्वात जलद शतक ठरले आहे. रवींद्र जडेजा अजूनही ८३ धावांवर खेळत आहे. भारताचे आघाडीचे पाच फलंदाज ९८ धावात बाद झाले, पण त्यांच्यापेक्षा जास्त धावा एकट्या पंतने केल्या. जेम्स अँडरसन आणि मॅथ्यू पॉट्टसने या मध्यमगती गोलंदाजांचा धडाका रोखण्यासाठी पंतने प्रतिहल्ला केला. अवघ्या ५१ चेंडूंत अर्धशतक केलेल्या पंतने ९१ चेंडूतच शतकी खेळी केली. त्याला रवींद्र जाडेजाची तोलामोलाची साथ लाभली, त्यामुळे भारताने आव्हानात्मक धावसंख्या उभारली आहे. त्यामुळे आता भारताचे गोलंदाज कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. बुमराहने नाणेफेक गमावल्यामुळे ढगाळ वातावरणात प्रथम फलंदाजी करण्याची वेळ भारतावर आली. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली या अनुभवी फलंदाजांसह शुभमन गिल, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी अपयशी ठरले. मात्र अय्यरऐवजी बढती देण्यात आलेल्या पंतने प्रतिहल्लाच केला. पंतने फटकेबाजी करताना वेगवान तसेच फिरकी गोलंदाज यांच्यात कोणताही भेदभाव केला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत दहा फलंदाज बाद केलेल्या जॅक लीचच्या एका षटकात पंतने दोन चौकार आणि एक षटकार खेचला होता. त्याला भक्कम साथ दिली ती रवींद्र जाडेजाने. अश्विनपेक्षा सरस फलंदाज असल्यामुळे जाडेजाला पसंती मिळाली. त्याने पंतला साथ देताना भारताची पडझड रोखली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ३२२ धावांची भागीदीरी केली आहे. सकाळच्या सत्रात भारतीय फलंदाज धावांसाठी संघर्ष करीत होते. ढगाळ वातावरणाचा अँडरसन आणि पॉट्टसने चांगला फायदा घेतला. भारतीय संघाचे एकदा तर तीन फलंदाजसहा षटकात बाद झाले होते. पावसाने खेळात व्यत्यय आणल्यानंतर भारतीय फलंदाज चांगलेच गोंधळात पडले होते. अँडरसनचे सातत्याने सीम आणि स्विंग होणारे चेंडूंनी पुजारा तसेच गिलला चूक करण्यास भाग पाडले. वेगाने आत आलेल्या चेंडूवर विहारी चकला, तर कोहलीने सोडून दिलेला चेंडू यष्टींवर आदळला. पंत आणि जाडेजाने या आघाडीच्या फलंदाजांना इंग्लंड खेळपट्ट्यांवर कसे खेळावे हेच दाखवले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/CEFQINe

No comments:

Post a Comment