Breaking

Sunday, July 31, 2022

अहो, जनाची नाय तर मनाची तरी...; पवारांनी शिंदे-फडणवीसांना असे काही सुनावले की... https://ift.tt/o6hsUFd

हिंगोली : विधानसभेतील विरोधी पक्षनेते (Ajit Pawar) यांनी राज्यातील आपल्या पाहणी दौऱ्यादरम्यान राज्याचे (CM Eknath Shinde) आणि (DY CM Devendra Fadnavis) यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. पूर आलेल्या कुरुंदा गावाकडे जात असताना अजित पवारांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबविला आणि एका शेतीची पाहणी केली. विशेष बाब म्हणजे यावेळी पाऊस सुरू होता. पाऊस सुरू असताना अजित पवारांनी शेतीची पाहणी केली, शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. दौऱ्यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री दिल्लीवारीत व्यग्र असल्याचे सांगत आपल्या खास शैलीत निशाणा साधला. ( criticizes and dy cm devendra fadnavis) राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र दिल्ली दौरे करत आहेत. त्यांनी दिल्ली व इतर दौरे थांबवून शेतकऱ्यांना मदत जाहीर करून अडचणीतून बाहेर काढले पाहिजे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी (३० जुलै) दुपारी डोंगरकडा (ता.कळमनुरी) येथे केले. कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजेश नवघरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, जेष्ठ नेते दत्तराव अडकिणे, आनंदराव कदम, डी. एन. अडकिणे, ठाकूरसिंग बावरी, डॉ. संतोष बोंढारे, शिवाजी शिंदे पुयनेकर, शेख शोएब, योगेश पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले की, सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यातच व्यस्त आहेत. राज्यात शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे मोठे संकट ओढवले आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष न देता त्यांचे दिल्ली दौरेच सुरूच आहेत. इथे माणसे मरत आहेत,जनावरे मरत आहेत आणि हे सत्कार समारंभ घेत आहे.या सरकारला जणाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजेत, असे खडे बोल सुनावत अजित पवार यांनी सरकारकडे शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी केली. राज्यातील शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी. सरकारने प्रत्येक जिल्हयासाठी पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करून नुकसानीची माहिती घ्यावी. राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन मोठा कालावधी लोटला तरी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कोठे आहेत हे कळायला मार्ग नाही. सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढले पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/QvzVDGH

No comments:

Post a Comment