: आम्ही जेव्हा गुवाहाटीला गेलो तेव्हा प्रथमदर्शनी आमच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र विश्वास दर्शक ठराव जेव्हा पास झाला तेव्हा (Eknath Shinde) यांच्याकडून जे काही भाषण झाले त्यानंतर सर्व शिवसैनिकांच्या मनातील गैरसमज हा दूर झाला. मी एकनाथ शिंदे यांच्या गटात जाऊन त्यांना पाठिंबा दिला ही कोणताही बंडखोरी नाही. आम्हाला कायद्याने दिलेला हा हक्क आहे, असे सांगतानाच दर दहा ते पंधरा वर्षांनी शिवसेनेत (Shiv Sena) फूट पडण्याचा प्रसंग का निर्माण होतो, असा सवाल (Rajesh Kshirsagar) यांनी केला आहे. ५५ पैकी ४० आमदार यांना सोडून जात आहेत याबाबतचा त्यांनी विचार करावा, असा सल्लाही क्षीरसागर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिला आहे. ( has given advice to Shiv Sena chief ) एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळालेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे आज कोल्हापुरात परतले. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात त्यांची जोरदार स्वागत केले आहे. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ही आमची बंडखोरी नसून हा उठाव आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होवून त्यांना पाठिंबा दिला ही आम्हा शिवसैनिकांची बंडखोरी नसून, शिवसेना संपवायला निघालेल्या महाविकास आघाडीतील मित्र पक्षांविरोधातील असंतोष आणि उठाव आहे. दर दहा ते पंधरा वर्षांनी शिवसेनेत अशी परिस्थिती का निर्माण होते याचा पक्षप्रमुखांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. शिवसेना पक्षवाढीसाठी जीवाचे रान केलेले शिवसैनिक उठावाची भूमिका का घेतात? याचा पक्षनेतृत्वाने कुटुंबप्रमुख म्हणून विचार करणे गरजेचे आहे असे ही राजेश क्षीरसागर यांनी म्हंटले आहे. क्लिक करा आणि वाचा- 'यामुळे शिवसेनेचे ५ आमदार पराभूत झाले' कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता २००९ साली कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेनेचे ३ आमदार निवडून आले. तत्कालीन सत्ताधारी कॉंग्रेस - राष्ट्रवादी विरोधात लोकांचे प्रश्न सोडविण्याची धमक आणि जनसेवा अखंडित ठेवल्यानेच २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे ६ आमदार निवडून आले. परंतु, २०१४ ते २०१९ च्या युती सरकारच्या काळात कोल्हापूर जिल्ह्याला शिवसेनेकडून मंत्रिपद मिळाले नाही. यामुळे २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेची वाताहात झाली. यामुळेच माझ्यासह शिवसेनेचे एकूण ५ आमदार पराभूत झाले. त्याचवेळी कोल्हापूर जिल्ह्यास शिवसेनेकडून मंत्रिपदाची संधी दिली गेली असती तर परिस्थिती वेगळी दिसली असती असे क्षीरसागर म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- 'आमचा देव मंदिरातच योग्य होता, शिवसैनिकांसाठी मातोश्री हे मंदिर' २०१९ च्या पराभवानंतरही पक्षप्रमुख उध्दव ठाकरेयांनी माझ्याकडे असलेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष पद कायम ठेवले म्हणत त्यांचे आभार ही क्षीरसागर यांनी मानले. ठाकरे यांनी देखील पर्यटन विभागाच्या माध्यमातून शहराच्या पर्यटन वाढीसाठी निधी दिला मात्र "आमचा देव मंदिरातच योग्य होता" शिवसैनिकांसाठी मातोश्री हे मंदिर असून, महाराष्ट्राच्या राजकारणात रिमोट कंट्रोलची भूमिका "मातोश्री" ने बजावली आहे. त्याच पद्धतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री वरून रिमोट कंट्रोलर ची भूमिका बजावली असती तर आज ही परिस्थिती उद्भवलीच नसती, असे ही क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- 'आम्ही एकनाथ शिंदे यांना गुरू मानले' शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनसेवेचे काम पाहून आपण त्यांना गुरु मानले आहे. त्यांच्या माध्यमातून होणारी आरोग्य सेवेची कामे, विकासाची कामे, मुंबई नंतर ठाणे जिल्ह्याचा झालेला विकास आदींचा विचार करता त्यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्याचे ध्येय शिवसेनाप्रमुखांचे खरे हिंदुत्ववादी विचारांची जपणूक उराशी बाळगूनच मी एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालो आहे, असे राजेश क्षीरसागर म्हणाले आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/wRrF4cv
No comments:
Post a Comment