लंडन : लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात भारतीय संघाची पराभवाची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. इंग्लंडने भारतापुढे विजयासाठी २४७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने आपले अव्वल चार फलंदाज फक्त ३१ धावांत गमावले आणि तिथेच भारताचा पराभव निश्चित झाला. लॉर्ड्सच्या मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये १४ जुलै २०१८ या दिवशी वनडे सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यातही भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर आज झालेल्या सामन्यातही भारतीय संघावर मानहानीकारक पराभवाची नामुष्की ओढवली. गेल्या सामन्यात भारतीय संघ ८६ धावांनी पराभूत झाला होता, पण यावेळी त्यांना तब्बल १०० धावांनी पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने भारतापुढे विजयासाठी २४७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा हा शून्यावर बाद झाला आणि भारताला मोठा धक्का बसला. गेल्या सामन्यात रोहितने दमदार अर्धशतक झळकावले होते. पण या सामन्यात मात्र त्याला एकही धाव करता आली नाही. रोहितपाठोपाठ भारताचा दुसरा सलामीवीर शिखर धवनही ९ धावा करत तंबूत परतला. भारताला हे दोन मोठे धक्के बसले होते. पण त्यानंतर रिषभ पंत भोपळाही न फोडता बाद झाला आणइ भारताला तिसरा धक्का बसला. भारताला तीन धक्के बसले असले तरी त्यावेळी खेळपट्टीवर विराट कोहली उभा होता. या सामन्यात त्याने संघात पुनरागमन केले होते. त्यामुळे या सामन्यात तो मोठी खेळी साकारेल आणि भारतासाठी आधारस्तंभ ठरेल, असे काही जणांना वाटत होते. पण कोहली या सामन्यातही पुन्हा अपयशी ठरला. कोहलीला १६ धावांवर समाधान मानावे लागले. इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची ४ बाद अशी दयनीय अवस्था झाली होती. पण त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या हे खेळपट्टीवर होते आणि त्यांच्याकडून भारताला मोठ्या अपेक्षा होत्या. कारण या दोघांकडेही एकहाती सामना फिरवण्याची ताकद आहे आणि ते या सामन्यात हीच ताकद दाखवतील, अशी आशा भारताच्या चाहत्यांना होती. पण सूर्यकुमार आणि हार्दिक हे अनुक्रमे २७ आणि २९ धावांवर बाद झाले आणि भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या. त्यानंतर रवींद्र जडेजाने २९ धावांची खेळी साकारली, पण तोपर्यंत भारताचा पराभव निश्चित झाला होता. भारताला या सामन्यात मालिका विजयाची सुवर्णसंधी होती, पण या पराभवाने भारतीय संघाने ती गमावल्याचे पाहायला मिळाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/E7OGRB9
No comments:
Post a Comment