Breaking

Friday, July 8, 2022

राष्ट्रगीतानं दिंडीची सुरुवात, राष्ट्रभक्तीचा जागर,लोहसरच्या वारकऱ्यांची अनोखी दिंडी https://ift.tt/QSe4o6s

अहमदनगर : करोना संसर्गाचं संकट कमी झाल्यानंतर दोन वर्षांनतर आषाढी वारी पार पडतेय. वारकरी पांडुरंगाच्या ओढीनं पंढरपूरकडे संतांच्या अभंगांचा गजर करत निघाले आहेत. यंदाचा आषाढी वारी सोहळा अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आषाढी वारीच्या सोहळ्यात अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील लोहसर गावातील वारकरी दिंडीच्या निमित्तानं पंढरपूरची वाट चालत आहे. विशेष म्हणजे या दिंडी सोहळ्याची सुरुवात आणि समारोप राष्ट्रगीतानं होते. या दिंडी सोहळ्यात राष्ट्रध्वज आणि वारकऱ्यांचा ध्वज घेऊन महिला पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात. दिंडी सोहळ्याचं पाचवं वर्ष पाथर्डी तालुक्यातील आदर्श गाव लोहसर येथील वैभव संपन्न जागृत श्री काळ भैरनाथ देवस्थान ट्रस्ट आयोजित लोहसर ते पंढरपूर दिंडी सोहळ्याने 29 जून रोजी लोहसर येथून पंढरपूर कडे प्रस्थान केले आहे. दिंडी सोहळ्याचे हे 5 वे वर्ष असून शिस्तबद्ध आदर्श दिंडी उत्सव म्हणून प्रसिद्ध आहे. वारकरी परंपरा जपताना देशभक्ती मनात जागृत व्हावी या उद्देशाने देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अनिल गिते पाटील यांच्या संकल्पनेतू दिंडीत भगव्या झेंडया बरोबर तिरंगा ध्वज घेऊन वारकरी पंढरपूर कडे निघाले आहेत. राष्ट्रभक्तीची प्रेरणा तिरंगा ध्वज पंढरपूरला घेऊन जाण्याच नेतृत्व दोन महिला करत आहेत. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी रोज 5.30 ,वाजता देवाची आरती झाल्या नंतर ध्वजगीत होऊन प्रवासाची रोजची सांगता होते. भगव्या ध्वजा बरोबर तिरंगा ध्वज दिंडी मार्गावर राष्ट्रभक्तीची प्रेरणा देत आहे. या दिंडी सोहळ्याचे अनेक ठिकाणी स्वागत होत आहे व या दिंडीचे वेगळेपण जाणवत आहे. या दिंडी सोहळ्याचे नेतृत्व देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अनिल गिते पाटील देवस्थान सचिव रावसाहेब वांढेकर , देवस्थान विस्वस्त रविंद्र जोशी , बाजीराव दगडखैर, गोरक्षनाथ गिते , राजेंद्र दगडखैर, शिवाजी दगडखैर, अजीनाथ रोमन , ईश्वर पालवे , बाबाजी गिते, कांता गिते , म्हातारदेव रोमन , सागर बाठे, छबु कापसे, गोरख वांढेकर, महादेव गिते, तुकाराम वांढेकर मंदा गिते, लीला गिते , विद्या जोशी, शुक्लाताई सानप, किसन पवार ,मच्छिंद्र चव्हाण, कमलताई रोमन, रावसाहेब नवघरे, निवुती गिरे करत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/G5EghaO

No comments:

Post a Comment