मुंबई : यांनी ६ जुलै रोजी कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या निर्णयानंतरही वारकऱ्यांच्या वाहनांना टोल आकारला जात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. अखेर राज्य सरकारकडून यासंबंधी परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार वारकऱ्यांच्या वाहनांचा टोल माफ करण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे यांची ६ जुलै रोजी घोषणा, ८ जुलै रोजी परिपत्रक एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांच्या वाहनांना कोकणातील गणेशोस्तवाच्या पार्श्वभूमीवर टोल माफीचा निर्णय जाहीर केला होता. वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले होते. आज त्यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे. पंढरपूरला यात्रेसाठी जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी मिळेल याची खात्री संबंधित विभागाने करावी,अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या आहेत.याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. टोलमाफी कागदावर असल्याची काही वारकऱ्यांना अनुभव आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या वाहनांना टोल माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र टोलमाफी कागदावरच असल्याचा अनुभव अकोल्यातील वारकऱ्यांना आला अकोल्यातील काही वारकरी पंढरपूर ला जात असताना आला होता. बीड- उस्मानाबाद रोड वरील पारगावच्या आयआरबी कंपनीच्या टोल नाक्यावर वारकऱ्यांकडून टोल वसुली करण्यात आली होती. यावेळी वारकऱ्यांनी टोल मागणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. त्यामुळे वारकऱ्यांना देण्यात आलेली टोलमाफी कागदावरच आहे का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला होता. अखेर राज्य सरकारकडून आज परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. १५ जुलैपर्यंत टोलमाफी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या, भाविक व वारकऱ्यांना "आषाढी एकादशी २०२२" गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करुन आवश्यक त्या संख्येनुसार स्टीकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस / पोलीस, संबंधित आर.टी.ओ. यांनी समन्वय साधून पोलीस स्टेशन्स, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ ऑफीसेस मध्ये दि. ०७ जुलै २०२२ पासून उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. पंढरपूरला जातेवेळी व पंढरपूरहून परत येतेवेळी दि.०७.०७.२०२२ ते दि. १५.०७.२०२२ या कालावधीत ही सवलत पालख्या, भाविक व वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठीच असेल, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्या आहेत. सदरचे पास पथकर सवलतीसाठी ग्राह्य धरण्यात येतील याप्रमाणे स्टीकर्स तयार करण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/DqN3ntA
No comments:
Post a Comment