लंडन : मराठीमध्ये एक म्हण आहे, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. ही म्हण आता भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीबाबत तंतोतंत लागू पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण विराट कोहलीने स्वत:हून आता आपल्याच पायावर धोंडा मारून घेतल्याचे समोर आले आहे. विराट सध्याच्या घडीला वाईट फॉर्ममध्ये आहे. त्याच्याकडून धावा होताना दिसत नाहीत. पण तरीही तो संघात कायम आहे. फक्त अनुभवाच्या जोरावर त्याने संघातील स्थान टिकवले आहे. पण सध्याच्या घडीला त्याचा फॉर्म मात्र वाईट आहे. ही फक्त एका मालिकेची गोष्ट नाही तर गेल्या अडीच वर्षांमध्ये त्याला एकही शतक झळकावता आलेले नाही, यावरून तुम्हाला त्याचा फॉर्म कसा आहे हे समजू शकेल. पण विराटला फॉर्मात येण्यासाठी बीसीसीआय मदत करत होती. पण विराटने यावेळी एक मोठू चूक केली आहे. बीसीसीआय सध्याच्या घडीला ट्वेन्टी-२० विश्वचचषकासाठी संघ बांधणी करत आहे. त्यासाठी त्यांनी विराट कोहलीचाही विचार केला आहे आणि त्याला खेळण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. सध्याच्या घडीला विश्वचषकासाठी संघ बांधला तर त्यांना चांगला सराव मिळू शकतो, असे बीसीसीआयला वाटत आहे. पण फॉर्मात नसतानाही विराट कोहलीचे काही वेगळेच चालले आहे. कारण एकतर फॉर्मात नसताना त्याला संधी मिळत आहे. बीसीसीआयने वेस्ट इंडिज विरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी दमदार संघबांधणी करायचे ठरवले होते. या मालिकेसाठी विराटचाही विचार केला होता. पण विराटने स्वत:हून आपण या मालिकेत खेळणार नसल्याचे सांगितले आहे. जर खेळाडू खेळला नाही तर फॉर्मात येऊ शकत नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यासाठी बीसीसीआयला विराटला संधी देत आहे, पण तोच यावेळी संघी नाकारत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या विश्वचषकातील संघबांधणीला अडथळा येत आहे. विराट आपल्या निर्णयावर ठाम राहील्यामुळे बीसीसीआयला त्याला संघाबाहेर ठेवणे भाग पडले आहे. त्यामुळे विराटने आपल्याच पायावर धोंडा मारून घेतल्याचे समोर आले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/QUumyIf
No comments:
Post a Comment