Breaking

Friday, August 5, 2022

Gold Medal For India...बजरंग पुनियाने जिंकलं सुवर्णपदक, राष्ट्रकुलमध्ये ऐतिहासिक कामगिरी https://ift.tt/dpevXoF

बर्मिंगहम : भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने भारताला कुस्तीमधील पहिले सुवर्णपदक जिंकवून दिले. बजरंगने यावेळी अंतिम फेरीत ९-२ असा विजय साकारला आणि देशाला सुवर्णपदक जिंकवून दिले. भारताला कुस्तीमध्ये या स्पर्धेत मिळालेले हे पहिले सुवर्णपदक आहे. टोकियो ऑलिम्पिक पदक विजेता बजरंगला ६५ किलो फ्रीस्टाइल प्रकारात कडव्या स्पर्धेला सामोरे जावे लागले नाही आणि त्याने देशासाठी सहज सुवर्ण जिंकले. अंतिम सामन्यात बजरंगला कॅनडाच्या लचलान मॅकनिलाचे आव्हान होते. हा सामना ९-२ असा जिंकून बजरंगने सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रकुलमधील तिसरे पदकराष्ट्रकुल स्पर्धेतील हे त्याचे दुसरे आणि एकूण तिसरे सुवर्ण आहे. २०१८ मध्येही त्याने ६५ किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते. २०१४ मध्ये त्याने ६१ किलो गटात रौप्य पदक जिंकले होते. कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्येही त्याची दोन सुवर्णपदके आहेत. या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे हे सातवे सुवर्ण आणि एकूण २२ वे पदक आहे. कुस्तीमध्ये बजरंगच्या आधी अंशू मलिकने रौप्यपदक जिंकले होते. बजरंग पुनियाविरुद्धच्या राउंड ऑफ १६ सामन्यात लोवे बिंघम त्याच्यासमोर होता. बजरंगने अवघ्या दोन मिनिटांत सामना जिंकला. यानंतर बजरंगने मॉरिशसच्या जीन बांडोविरुद्धही सहज विजय मिळवला. त्याने उपांत्य फेरीच्या लढतीत इंग्लंडच्या जॉर्ज रामचा १०-० असा पराभव करत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. टोकियो ऑलिम्पिकपासून बजरंग सतत दुखापतीशी झुंज देत होता. खेळापूर्वी तो अमेरिकेत प्रशिक्षण घेत होता. या वर्षी एप्रिलमध्ये त्याने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक मिळवले होते. कठोर संघर्ष केल्यानंतर मे महिन्यात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या चाचण्यांमध्ये तो यशस्वी झाला. अंशु मलिकला रौप्यपदकमहिलांच्या ५७ किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये तिची गाठ ओडुनायो फोलसाडे अडेकुरोयेबरोबर होती. अंशू मलिकने येथे सुरुवातीला ती थोडी बचावात्मक दिसत होती. त्यामुळे तिला सुरुवातीचा गुण कमावता आले नाही. पण या गोष्टीचा चांगलाच फायदा नायजेरियन कुस्तीपटूने उचलला आणि सामन्यात २-० अशी आघाडी घेतली होती. सुरुवातीलाच अंशुने सामन्यावरची पकड गमावली. त्यामुळे तिला पुढच्या खेळात जास्त आक्रमकपणे खेळ करता येणार नाही, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण तिने त्यानंतर चार गुणांची कमाई केली. पण प्रतिस्पर्धी खेळाडूने अनुभव पणाला लावत सहा गुण पटकावले आणि त्यामुळेच अंशुला या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला आणि तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/KptmeAQ

No comments:

Post a Comment