Breaking

Friday, August 5, 2022

उमेश कोल्हेंच्या हत्येनंतर आरोपींची बिर्याणी पार्टी, एनआयएचा कोर्टात मोठा दावा https://ift.tt/ht1Bfgk

अमरावती : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैंगबर यांच्याविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभर वाद निर्माण झाला होता. मुस्लीम समाजाचा वाढता रोष पाहता नुपूर शर्मा यांना भाजपच्या प्रवक्ते पदावरुन हटवण्यात आलं होतं. मात्र, नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचं समर्थन केल्यानं राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका टेलरचा खून करण्यात आला होता. महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये देखील अशाच प्रकारची एक घटना घडली होती. अमरावतीमधील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची नुपूर शर्मा यांचं समर्थन केल्यानं हत्या करण्यात आल्याचं उघड झालं होतं. उमेश कोल्हे यांच्या खून प्रकरणात नुपूर शर्मांच्या वक्तव्याचं समर्थन हे कारण असल्याचं समोर आल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यास सुरुवात करण्यात आली. एनआयएनं कोर्टात आणखी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. उमेश कोल्हे यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी बिर्याणी पार्टी केल्याचा दावा एनआयएनं कोर्टात केला आहे. अमरावतीचे व्हेटर्नरी मेडिसिन व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मांविषय़ी समर्थन करणारी पोस्ट केल्यानेच झाली होती. याबाबत वेगवेगळे खुलासे सातत्याने सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी एनआयएचे एक पथक अमरावती शहरात दाखल झाले या पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयात हजर केले. त्यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. जून महिन्यात उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने अमरावतीतल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला होता. न्यायालयाच्या चेंबरमध्ये प्रसारमाध्यमांना परवानगी नव्हती मात्र दोन आरोपींसाठी उपस्थित असलेले वकील अली काशिफ खान माहिती देताना म्हणाले की, एनआयएने न्यायालयात सांगितलं की उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर दोन्ही आरोपींनी बिर्याणी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत कोण कोण होतं याचा तपास करणं आवश्यक आहे, असंही स्पष्ट करण्यात आलं. एनआयए ने हा देखील आरोप केला आहे की यातला एक आरोपी अरबाझने उमेश कोल्हे यांच्यावर आणि त्यांच्या घरावर तसंच त्यांच्या मेडिकलवर लक्ष ठेवलं होतं. इतर आऱोपींना पळून जाण्यास आणि लपण्यास त्याने मदत केली होती असंही ने कोर्टात सांगितलं. एनआयएने सांगितले की, महाराष्ट्र पोलिसांनी 7 आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. तेव्हा त्यांना या आरोपींनी नेमकं काय केलं आहे याचा शोध लागला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/wEMT3uS

No comments:

Post a Comment