Breaking

Wednesday, August 17, 2022

पुण्यातील गणेश भक्तांसाठी महत्त्वाची बातमी, जिल्हाधिकाऱ्यांकडून मोठा निर्णय जाहीर https://ift.tt/0rUjof9

पुणे : राज्यातील प्रशासकीय यंत्रणा ३१ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पूर्वतयारी लागली आहे. राज्यातील प्रशासन आणि पोलीस दलाकडून विविध ठिकाणी सार्वजनिक मंडळांच्या प्रतिनिधींसोबत बैठका घेतल्या जात आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध परवानगी आणि नियमांसदर्भात माहिती दिली जात आहे. पुण्यातील गणेशभक्तांसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मोठी घोषणा केली आहे. गणेशोत्सव काळात पुण्यात ५ दिवसांसाठी ध्वनीक्षेपक रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यंदा चार ऐवजी पाच दिवसांसाठी परवानगी गणेशोत्सवादरम्यान चार ऐवजी पाच दिवस सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे उत्सवाच्या शेवटच्या दिवसांमध्ये म्हणजेच तीन ते नऊ सप्टेंबरदरम्यान ध्वनीक्षेपक तसेच ध्वनीवर्धकाचा वापर करण्याची मुभा गणेश मंडळाना मिळाली आहे. शनिवार (३ सप्टेंबर), रविवार (४ सप्टेंबर), मंगळवार (६ सप्टेंबर), बुधवार (७ सप्टेंबर) आणि शुक्रवार, (९ सप्टेंबर) या कालावधीत एकूण ५ दिवस परवानगी दिली आहे... पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळाचे देखावे तसेच सजावट पाहण्यासाठी पुणे शहरासह जिल्ह्यातील नागरीक मोट्या प्रमाणात गर्दी करतात. त्यावेळी ध्वनीक्षेपक तसेच ध्वनीवर्धक वापरण्याची रात्री दहा वाजेपर्यंत परवानगी असते. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या भक्तांना देखावे पाहता येत नाही. तसेच गणेश मंडळांचे देखाव्यांमध्ये ध्वनीक्षेपकाचा अधिक वापर केला जात आहे. दहा वाजेपर्यंत परवानगीमुळे देखावे जास्तवेळ सुरु ठेवता येत नाहीत किंवा त्याचे सादरीकरण करता येत नाही. यामुळे गणेश मंडळांसह भक्तांचा हिरमोड होत होता. त्यामुळे चार दिवस ध्वनीक्षेपक, ध्वनीवर्धक वाजविण्यास यापूर्वी मुभा देण्यात आली होती. हा कालावधी वाढवून देण्याची मागणी गणेशमंडळांकडून करण्यात आली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने पुणे दौऱ्यावर असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालावधी वाढवून देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक तसेच प्रदूषण नियंत्रण मडंळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात याबाबतचा निर्णय घेण्यात आला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/l0ewIhP

No comments:

Post a Comment