Breaking

Monday, August 8, 2022

अनिल परबांनी केलेल्या 'त्या' अन्यायाची व्याजासकट परतफेड करू; कदमांचा सज्जड इशारा https://ift.tt/4glkFzJ

रत्नागिरी : हे सरकार आपले आहे, मुख्यमंत्री महोदय आपले आहेत, असा ठाम विश्वास व्यक्त करत माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र यांनी माजी पालकमंत्री यांच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत शिवसैनिकांवर अन्याय झाला. अपक्ष निवडणूक लढवायला भाग पाडले गेले. झालेल्या या अन्यायाची व्याजासकट परतफेड केली जाईल, असा सज्जड इशारा माजी पालकमंत्री अनिल परब यांना आमदार योगेश कदम यांनी दिला आहे. शिंदे गटात सहभागी झाल्यावर आमदार योगेश कदम यांच्याहस्ते मतदारसंघात पाहिल्या नळपाणी योजनेचे भूमिपूजन झाले. यावेळी योगेश कदम यांनी बोचऱ्या शब्दात परबांवर टीका केली आहे. (mla gives warnig to shiv sena leader anil parab) येणाऱ्या निवडणुकांमध्ये भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असेही कदम या कार्यक्रमात म्हटले आहे. बदलत्या राजकिय परिस्थितीतही आमदार योगेश कदम यांनी मतदारसंघात विकासकामांचा झंझावात सुरू ठेवले आहे. विकासकामांची काळजी करू नका हे सरकार आपले आहे युतीचे सरकार आहे, असे सांगून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अधिकचे बळ देण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी यावेळी दिले. यावेळी व्यासपीठावर प्रदीप सुर्वे,भगवान घाडगे, प्रकाश कालेकर, रोहिणी दळवी, संतोष दळवी, अनंत वाजे,राजेंद्र फणसे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 'अनिल परब यांचेच षड्यंत्र' दुर्देवाने आपल्या शिवसेनेचेच पालकमंत्री अनिल परब पक्ष संपवायला निघाले होते. परिवहन मंत्री असताना परिवहन खात्याचे काहीही काम करायचे नाहीत. फक्त योगेश कदम संपवून मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचे कारस्थान करून रामदास कदम व योगेश कदमांविरोधात षडयंत्र रचण्याच्या बैठका मुंबईत अनिल परब घेत होते, असा घणाघाती आरोपही आमदार योगेश कदम यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काळात अनिल परब यांनी मतदारसंघात संघटनेत केलेले फेरबदल हाच विषय येथील राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू असेल हे स्पष्ट आहे. 'साने गुरुजींचे राष्ट्रीय स्मारक उभे राहील' परमपूज्य साने गुरुजींच्या पालगड या गावी राष्ट्रीय स्मारक, व येथील नळपाणी योजना अशा दोन मोठया कामांचा शब्द दिला होता. मागील सरकारमध्ये निधी मिळू शकला नाही. पण आता सरकार आपले आहे. या संधीचा उपयोग मतदारसंघातील विकासासाठी करू, असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. खासदार सुनील तटकरेंवरही साधला निशाणा ही विकासकाम करताना माझ्याकडून कोणताही प्रोटोकॉल चुकणार नाही. राजकिय शिष्टाचार पाळला जाईल असे स्पष्ट करत त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यावरही निशाणा साधला. भूमिपूजन पाटीवरून नाव काढा हे मी कधीही सांगितले नाही. पण हे तुम्ही केलत. आमदाराचे म्हणजे माझे नाव डावलून माजी राष्ट्रवादीच्या आमदाराचे नाव पाटीवर लावलेत, अशा शब्दात त्यांनी तटकरे यांचाही समाचार घेतला. विकासकामे करताना हे असली राजकारण कधीही आपल्याकडून होणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले आहेत. त्यांचा उपयोग शिवसैनिकांनाच होणार आहे. प्रसंगी आपण थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून विकासकाम मंजूर करू हा विश्वास मला आहे. याचा उपयोग आपल्याला सगळ्यांनाच होणार आहे, अशा शब्दात त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/BKDXfAi

No comments:

Post a Comment