: सध्या पावसाळा सुरू असल्याने अनेक ठिकाणी मुसळधार सुरू आहे. त्यामुळे अनेकजण पाण्यामध्ये उरतरुन किंवा नको त्या गोष्टींचा अतिरेक करत स्टंट करताना पहायला मिळत आहेत. त्यात अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागत आहेत. त्यातच जुन्नर तालुक्यातील बेल्हे परिसरात ढग सदृश्य पावसामुळे ओढ्या नाल्याना पूर आल्याची स्थिती निर्माण झाली आहे. (Two youths was swept away while taking the bike through the flood waters) मात्र या पुरातून जाण्याचे धाडस दोन तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. बेल्हे परिसरातील गुळुंचवाडी येथील ओढ्याला पूर आला होता. पूर आलेला असताना देखील दोन तरुणांनी या पुरातून गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह एवढा होता की, या पुरात दोघेही तरुण दुचाकीसह वाहून गेले आहेत. मात्र त्यांचे नशीब चांगले म्हणून काही अंतरावर गेल्यावर ते पाण्याच्या प्रवाहाने बाहेर फेकले गेले आणि त्या दोन्ही तरुणांचा जीव वाचला आहे. असल्या जीवघेण्या स्टंटमुळे आपल्याला जीव गमवावा लागू शकतो. क्लिक करा आणि वाचा- या घटनेचा सर्व व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. परिसरातील नागरिक या दोन्ही तरुणांना सांगत होते की, ओढ्याला पूर आला आहे, गाडी घेऊन जाऊ नका मात्र या दोन तरुणांनी भलतेच धाडस करत पुरातून जाण्याचा प्रयत्न केला. आणि दुचाकीसह वाहून जाऊ लागले. मात्र नशिबाने साथ दिली म्हणून त्यांचे प्राण वाचले असेच म्हणावे लागेल. क्लिक करा आणि वाचा- सध्या अनेक ठिकाणी ढग फुटी होत असल्याने ग्रामीण भागात ओढ्याना पूर येत आहे. त्यामुळे पाण्याचा अंदाज बांधता येत नसल्याने कुणीही असे जीव घेणे स्टंट करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/vPUWCR0
No comments:
Post a Comment