: कल्याणमध्ये विजय तरुण मंडळाकडून करण्यात आलेल्या शिवसेनेतील देखाव्यावर पोलिसांनी आक्षेप घेत पहाटेच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात कारवाई केली. शिवाय मंडळाच्या विश्वस्तांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या कारवाईनंतर मंडळासह शिवसेनेने देखील आक्रमक पवित्र घेतला आहे. कारवाईचा निषेध नोंदवत यंदा मंडळांनी गणेश मूर्तीची स्थापनाच केली नाही. या बरोबरच मंडळाने पोलिसांच्या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागितली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ आज मंडळाच्या मंडपात व मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून महाआरतीचा आयोजन करण्यात आलं होतं. या आरतीमध्ये शिवसेना पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. (after the police action, shiv sainiks in knocked on the door of the court) यावेळी विजय साळवी यांनी ५९ वर्षे जुनं मंडळ असताना या मंडळावर पोलिसांच्या फौज फाट्यासह रात्री कारवाई करण्यात आली. या कारवाईचा निषेध करण्यासाठी या मंडळातर्फे महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होते. पोलिसांनी देखाव्यावर केलेल्या या कारवाईनंतर या प्रकारावर शिवसेनेचे कल्याण डोंबिवली महानगर प्रमुख विजय साळवी यांनी निषेध व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, विजय तरुण मंडळाचे हे ५९ वे वर्ष आहे. इतके जुने मंडळ असतानाही या मंडळावर अतिरेकी कारवाई करण्यात आली. मध्यरात्रीनंतर ३ वाजत ५०० पोलीस दरोडेखोर येतात तसे आले. कारवाई करून सजावट जप्त करण्यात आली. याच्या निषेधार्थ कल्याण शहर शिवसेना शाखेने महाआरतीचे आयोजन केले. विजय साळवी प्रतिक्रिया देताना पुढे म्हणाले की, आम्ही दाखल केलेल्या उद्या १० वाजता आमच्या याचिकेवर सुनावणी आहे. याचिकेच्या सुनावणीदरम्यान आमच्या बाजूने कौल लागेल असे वाटते आणि तो लागणारच आहे. घटनेने आम्हाला अधिकार दिलेले आहेत. ते अधिकार हिरावून घेतले गेले तर ब्रिटिश आणि आपल्यात काही फरक राहणार नाही, हे सरकार जेवढी पापं करेल तेवढे त्यांच्या पापाचा घडा भरणार हे निश्चित.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/VwnYyfh
No comments:
Post a Comment