पुणे : चारचाकी वाहन अडवून वाहनावर गोळीबार करून तब्बल ३ कोटी ६० लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुकपाटी येथे शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भावेशकुमार अमृत पटेल,( वय ४० वर्ष) रा. कहोडा, ता. उंझा, जि. मेहेसाना राज्य गुजरात, सध्या रा. पंचरत्न बिल्डींग, मुंबई, यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. फिर्यादींच्या माहितीप्रमााणं , शुक्रवारी २६ ऑगस्ट रोजी रात्री २:३० वाजण्याच्या सुमारास मौजे वरकुटे पाटी गावचे हददीत पुणे- सोलापुर राष्ट्रीय महामार्गांवर रोडवर गतीरोधकावर आल्यावर चारचाकी स्कॉपीओ गाडी नंबर. टी. एस. ०९/ ई.एम. ५४१७ ही सोलापुर पुणे रस्त्याने चालवत घेवून येत असताना अज्ञात चार अनोळखी चोरट्यांनी पायी चालत येत हातात लोखंडी टॉमी दाखवून फिर्यादींची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. पटेल यांनी गाडी तेथून भरधाव वेगात सोलापूर रस्त्याने पुण्याच्या दिशेने घेऊन जात असताना त्यांनी दोन चार चाकी वाहना मधून गाडीचा पाठलाग केला. गाडी थांबवत नाही म्हणून आरोपींनी गाडीवर फायरिंग करून रस्त्यात गाडी अडविली. गाडी मधून चौघे उतरले त्यांनी मला व विजयभाई यांना हाताने मारहाण केली. त्यावेळी गाडीमध्ये दोघेजण बसलेले होते. आम्हाला मारहाण करून त्यांनी आमच्या गाडीतील ३ कोटी ,६०,लाख रू रोख रक्कम व १४ हजाराचे दोन १२ हजाराचा एक मोबाईल असे एकुण ३ कोटी ६० लाख,२६, हजार रुपये किंमतीचा माल जबरदस्तीने चोरून नेल्याचे भावेशकुमार पटेल यांच्या तक्रारीत म्हटले आहे. सदर घटनास्थळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,बारामतीचे उपविभागीय पोलीस अधीकारी गणेश इंगळे, सुरेशकुमार धस ,गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अशोक शेळके, भिगवणचे सपोनि दिलीप पवार यांनी भेट देवुन गुन्हयाचा सखोल तपास चालू आहे. सदर गुन्हयाचे तपाससाठी पाच पोलीस पथके तयार केली असून तपास कामी रवाना करण्यात आल्याची माहिती इंदापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरिक्षक प्रभाकर मोरे यांनी दिली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/LlD7yJR
No comments:
Post a Comment