जळगाव : "बंडखोरी नंतर यांचं काही खरं नाही असं काही जण म्हणत होते. मात्र त्यांना आजची रॅली पाहून त्यांचं उत्तर मिळालं असेल. आज जिल्ह्यातलं असं एक गाव नाही, की ज्या गावातून लोक माझ्या स्वागताला आले नाही. रॅली पाहून तीन तासानंतरही अजून थकवा आलेला नाही. ही गर्दी पाहून लक्षात आलं असेल की गुलाबराव पाटलांचं कुणी काही वाकड करु शकत नाही. मी जर माझा तिसरा डोळा उघडला तर काय करु शकतो हे त्यांना माहिती नाही", असा इशाराच यांनी आपल्या विरोधकांना दिला. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच गुलाबराव पाटील जळगाव जिल्ह्यात आले होते. जिल्ह्यातील नागरिकांनी यावेळी त्यांचं दणक्यात स्वागत केलं. शेकडो कार्यकर्त्यांनी गुलाबराव पाटील यांची जंगी मिरवणूक काढली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना गुलाबरावांनी नेहमीच्या अंदाजात भाषण ठोकलं. माझी ३५ वर्षांची तपश्चर्या फळाला आली "गेले काही मी दिवस गप्प होतो, मी मंत्री होऊ नये म्हणून काही जणांनी देव पाण्यात ठेवले होते. पण मी तिसऱ्यांदा मंत्री झालो. मिरवणुकीत हजार गाड्या होत्या, पैसा कितीही असला तरी बाजारात माणूस विकत घेता येत नाही, 35 वर्षांची माझी ही तपश्चर्या आहे", असं गुलाबराव म्हणाले. प्रत्येकाला वाटतं चांगलं खातं मिळावं "खातेवाटपाबाबत कल्पना नाही. आमच्या पक्षात कोणतीही नाराजी नाही, प्रत्येकाला वाटत असतं की, आपल्याला चांगले खाते मिळावे आणि साहजिक तो प्रत्येकाचा अधिकार आ", अशी प्रतिक्रिया त्यांनी खातेवाटपावर दिली. खडसेंना उत्तर जळगाव जिल्ह्याला मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील या दोघांना मंत्रीपद मिळालंय. आता त्यांनी तू तू मैं मैं करु नये. सर्वसामान्यांसाठी काम करावं, असं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं. त्यावर 'आम्ही एकनाथ खडसेंचे मार्गदर्शन घेऊ', असं गुलाबराव पाटील म्हणाले. आमचा खरा देव एकच- बाळासाहेब ठाकरे त्यात हिस्से पाडू नका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेना भवन उभारण्यावरून टीका केली होती. कितीही भवन उभारले तरी शिवसेनेचा खरा देव हा मातोश्रीमध्येच आहे, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं होतं. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, "आम्ही शिंदे गटात असलो तरी आमचे दैवत हे बाळासाहेब ठाकरेच आहे. आम्हीही बाळासाहेबांना मानतो. तेच आमचे दैवत आहे मात्र देवामध्ये वाटे हिस्से पडू नये"
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/r2BGoRa
No comments:
Post a Comment