Breaking

Saturday, August 13, 2022

खळबळजनक! त्यांच्यामध्ये सुरू होती वर्चस्वाची लढाई, ती इतकी टोकाला गेली की उचलले धक्कादायक पाऊल https://ift.tt/TK0fD2n

: वर्चस्वाच्या वादातून अकोल्यात मोठा घातपात झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत एकाची हत्या तर एक जण जखमी झाला आहे. अकोला शहरातील न्यू तापडिया नगरमध्ये वर्चस्वाच्या वादातून चाकूने वार करीत हे हत्याकांड घडले आहे. ही घटना काल शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणात सिव्हिल पोलिस पुढील तपास करीत आहे. (one has been murdered in akola due to a dispute over supremacy) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद वामन ठोंबरे (वय ३५ वर्षे) यांच्यावर आज शनिवारी रात्री १० वाजता हल्ला करुन हत्या करण्यात आली. तर हल्ला करणारा मारेकरी सुहास वाकोडे हा देखील जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लवकरच पोलीस त्याला ताब्यात घेणार आहेत. अनेक दिवसांपासून मृतक विनोद आणि मारेकऱ्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरु होती, आज या लढाईचं रूपांतर हत्येपर्यंत पोहोचलं. सुहासने विनोदच्या छातीवर आणि अंगावर चाकूने वार करीत त्याला गंभीर जखमी केले, त्यात त्याचा मृत्यू झाला. अकोला शहरातील सिव्हिल पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या न्यू तापडिया नगरातील गणेश मंदिर जवळ हे हत्याकांड घडले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. सध्या मारेकरी जखमी असलेला सुहास वाकोडे याच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या धक्कादायक घटनेनंतर अकोला शहरात चांगलीच खळबळ उडालीय. दरम्यान, या घटनेत किती मारेकऱ्यांचा समावेश आहे, याचाही तपास पोलीस करताहेत. तरीही या हत्येचं नेमकं कारण काय याबाबत अद्याप काही कळू शकले नाही. सुहास'वर पोलिसांकडून झाली होती 'एमपीडीए'ची कारवाई सुहास वाकोडेवर सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारीवर आळा बसावा यासाठी अकोल्याचे पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी सुहास वर एमपीडीए नुसार कारवाई केली होती. या कारवाईत त्याला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. एमपीडीए अंतगर्त शिक्षा भोगून कारवाई पूर्ण झाल्यानंतर सुहास कारागृहातून सुटला होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/hj6XbYs

No comments:

Post a Comment