मुंबई : कितीही टीका झाली तरी बिग बॉस (Bigg Boss) हा कार्यक्रम प्रेक्षक आवडीनं बघत असतात. या कार्यक्रमाला जी लोकप्रियता मिळाली आहे त्यामुळेच दरवर्षी हा कार्यक्रम नवीन नवीन कलाकार स्पर्धक आणि थीम घेऊन निर्माते तितक्याच उत्साहात येत असतात. यंदा देखील या कार्यक्रमाचं १६ पर्व लवकरच येणार असून प्रेक्षक त्याची आतुरतेनं वाट बघत आहेत. यंदाही कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी भाईजान अर्थात सलमान खान (Salman Khan) कडेच असणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. परंतु यंदा सलमाननं जे मानधन आकारलं आहे तो आकडा ऐकून तुम्ही देखील आश्चर्यानं तोंडात बोटं घालाल. कारण यंदाच्या सीझनमध्ये सलमाननं रेकॉर्ड ब्रेक मानधन आकारलं आहे. सलमाननं जे मानधन घेतलं आहे, त्या रक्कमेमध्यो बॉलिवूडमधील दोन बिग बजेट सिनेमे नक्कीच तयार होतील! हे वाचा- सलमान खाननं आकारलं इतकं मानधन बिग बॉसच्या १६ व्या पर्वासाठी सलमान खानचं सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असणार आहे. दरवर्षी सलमान किती मानधन आकरतो याकडे सर्वाचं लक्ष असतं. यंदाही हा कार्यक्रम सुरू होण्याआधी सलमानच्या मानधनाची चर्चा सुरू झाली आहे. यंदाच्या सीझनसाठी सलमाननं रेकॉर्डब्रेक मानधन मागितल्याची जोरदार चर्चा आहे. मीडिया रिपोर्टनुसार बिग बॉसच्या १६ व्या पर्वाचं सूत्रसंचालन करण्यासाठी भाईजाननं थोडंथोडकं नाही तर एक हजार कोटी इतकं मानधन आकारलं. सध्या या रेकॉर्डब्रेक फीचीच जोरदार चर्चा आहे. सलमाननं जितकं मानधन घेतलं आहे त्या रक्कमेमध्ये दोन बिग बजेट सिनेमे नक्कीच होतील. लवकरच प्रदर्शित होणारा ब्रह्मास्त्र सिनेमाचं बजेट देखील ५०० कोटी रुपये आहे. तर आरआरआर हा सिनेमा देखील तितक्याच बजेटमध्ये तयार झाला होता. हे वाचा- या कलाकारांच्या नावाची चर्चा दरम्यान, बिग बॉस १५ मध्ये कोणते कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. सध्या तरी या कार्यक्रमात विशाल पांड्या, फैजल शेख, कनिका मान, मुनव्वर फारुकी, ट्विंकल कपूर, शिविन नारंग, विवियन डीसेना, फरमानी नाज या कलाकारां सहभागाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, कधीपासून सुरू होणार याबाबत निर्मात्यांनी अधिकृतपणे घोषणा केलेली नाही.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Gs28t0F
No comments:
Post a Comment