मुंबई : आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी ठरलेला संघ आहे तो मुंबई इंडियन्स. आतापर्यंत मुंबई इंडियन्सने आयपीएलची सर्वाधिक जेतेपदं आपल्या नावावर केली आहेत. पण आता मुंबई इंडियन्सच्या संघाने आपलं नाव बदललं आहे. वाचा- पाचवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सने आपला विस्तार वाढवला आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या फ्रँचायझीने दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती लीगमध्ये संघ विकत घेतले आहेत. मुंबई इंडियन्सच्या मालकांनी बुधवारी युएईच्या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० लीग आणि दक्षिण आफ्रिका ट्वेन्टी-२० लीगमधील त्यांच्या दोन नवीन फ्रँचायझींची नावे जाहीर केली. या संघांची मालकी भारतातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स समूहाकडे आहे. वाचा- युएईच्या लीगसाठी फ्रँचायझीचे नाव '' असेल, तर दक्षिण आफ्रिका लीगमध्ये '' असेल. दोन्ही संघ आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स फ्रँचायझीप्रमाणेच जर्सी घालतील. मुंबई इंडियन्सच्या अधिकृत निवेदनानुसार, युएई आणि दक्षिण आफ्रिकेतील ट्वेन्टी-२० लीगमधील फ्रँचायझींची नावे तेथील विशिष्ट प्रदेशांना लक्षात घेऊन ठेवण्यात आली आहेत. निवेदनात पुढे म्हटले आहे की, "नवीन संघ मुंबई इंडियन्ससारखे असतील. एका कुटुंबाचा जागतिक विस्तार लीगची मूल्ये ते नक्कीच पुढे नेईल, त्यामुळे मुंबई इंडियन्सला फ्रँचायझीला क्रिकेट विश्वात जास्त प्रेम आणि सन्मान मिळेल." वाचा- रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालिका नीता अंबानी म्हणाल्या, "मला खात्री आहे की, 'MI Emirates' आणि 'MI cape town' दोन्ही संघ चांगली कामगिरी करतील आणि मुंबई इंडियन्सचा जागतिक क्रिकेट वारसा आणखी उंचीवर नेतील." वाचा- मुंबई इंडियन्सने आता आपला विस्तार केला आहे. आता मुंबई इंडियन्सने तीन संघ विविध ट्वेन्टी-२० लीगमध्ये खेळताना दिसतील. या संघांच्या नावात बदल असला तरी त्यांची जर्सी मात्र सारखीच असेल. पण यावेळी संघातील खेळाडूंबाबत मात्र कोणतीच माहिती समोर आलेली नाही. आयपीएलमधील खेळाडू या लीगमध्ये खेळू शकतील की नाही, याबाबतही अजून कोणती माहिती मिळालेली नाही. त्यामुळे या दोन्ही लीगमध्ये नेमके कोणते खेळाडू संघाचा भाग होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/4IFCMvQ
No comments:
Post a Comment