Breaking

Wednesday, August 10, 2022

फुटबॉल विश्वचषकाच्या वेळापत्रकात मोठा बदल, पाहा पहिला सामना कधी सुरु होऊ शकतो https://ift.tt/S52ouR0

दोहा : फुटबॉल विश्वचषक आता काही दिवसांवर आला आहे. पण आता या स्पर्धेच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. विश्वचषकातील पहिला सामना २१ नोव्हेंबरला होणार होता. पण आता पहिला सामना मात्र २१ नोव्हेंबरला सुरुवात होणार नसल्याचे समोर आले आहे. वाचा- कतारमधील वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा जेमतेम शंभर दिवसांवर आलेली असताना स्पर्धा कार्यक्रमात बदल करण्याची विनंती करून संयोजकांनी जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा)चांगलीच कोंडी केली आहे. यजमानपद दिल्यापासून वादात असलेल्या या स्पर्धेबाबत नवा वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत. फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार आहे. वाचा- कतारला १२ वर्षांपूर्वी वर्ल्ड कपचे यजमानपद देण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी स्पर्धेचा कार्यक्रमही निश्चित झाला. मात्र, संयोजकांनी स्पर्धा एक दिवस अगोदर सुरू करण्याची विनंती केली आहे. खरे तर काही स्पर्धांपासून वर्ल्ड कपचे यजमान सलामीची लढत खेळतात. मात्र, यंदाच्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी चार सामने घेण्याचा निर्णय झाला. त्यात यजमान कतारची सलामीली लढत पहिल्या दिवसाचा तिसरा सामना असेल, असा निर्णय झाला होता. ही लढत २१ नोव्हेंबरला होणार आहे. पण हा सामना आता २० नोव्हेंबरला सुरुवात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. वाचा- कतारने आता आपली सलामीची लढत २० नोव्हेंबरला खेळवण्याची विनंती केली आहे. स्पर्धा कार्यक्रमात बदल करणे भाग पडल्यास त्याबाबत निर्णयाचा अधिकार उच्चस्तरीय समितीचा आहे. या समितीत सहा खंडांच्या महासंघांचे प्रमुख; तसेच ‘फिफा’चे अध्यक्ष असतात. त्यांना आता हा बदलाचा निर्णय घेणे भाग पडणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीची लढत यजमान अन्यथा गतविजेता संघ खेळतो. जर्मनीने २००६ मध्ये स्पर्धा घेताना यजमान संघाची सलामीची लढत सलामीला ठेवली. तेव्हापासून यजमान देशाची सलामीला लढत होण्यास सुरुवात झाली. मात्र, यंदाच्या स्पर्धेतील सलामीची लढत नेदरलँड्स आणि सेनेगल यांच्यात आहे. यापैकी कोणीही गतविजेता नाही अथवा यजमानही नाही. आता ‘फिफा’ची उच्चस्तरीय समिती कतारची विनंती मान्य करील, अशी चिन्हे दिसत आहेत. त्यांनी वर्ल्ड कपमधील पहिला सामना गतविजेते किंवा यजमान खेळत असल्याची परंपरा आहे, अशा आशयाचे पत्र लिहिले असल्याचे समजते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/0DTjkcY

No comments:

Post a Comment