Breaking

Tuesday, August 30, 2022

दुर्दैवी! शेतकरी पिकाला पाणी द्यायला गेला, त्याने विजेचा पंप सुरू केला आणि होत्याचे नव्हते झाले https://ift.tt/LDShfdJ

परभणी : पिकाला पाणी देण्यासाठी वीजपंप चालू करण्यास गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आज जिंतूर तालुक्यातील सावरगव येथे घडली आहे.गौतम भिमराव सोनवणे वय (३२वर्षे) असे मृत्यू झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ( in Parbhani while ) तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो की काय अशी शेतकऱ्यांमध्ये भीती आहे. या भीतीने उपलब्ध साधनाचा वापर करून शेतातील पिक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. परंतु वेळेवर वीज उपलब्ध होत नसल्यामुळे ज्यावेळेला विज असेल त्यावेळेला शेतकरी सुकत असलेले पिके वाचवण्यासाठी विजपंपाचा वापर करत आहेत. मात्र घाई गडबडीत मोटार चालू करण्यासाठी गेल्यावर अपघात होतात असाच प्रकार सावरगाव येथे घडला आहे. क्लिक करा आणि वाचा- शेतकरी गौतम भिमराव सोनवणे वय (३२वर्षे) शेतातील पिके सुकू लागल्याने या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी मोटार लावण्यासाठी गेला असता सदरील शेतकऱ्यास विजेचा जोरदार झटका लागला. यावेळी नातेवाईकांना लक्षात येताच शेतकऱ्यास गंभीर अवस्थेत नातेवाईक व ग्रामस्थांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. क्लिक करा आणि वाचा- रुग्णालयातील डॉ.फहाद खान यांनी तपासून शेतकऱ्यास मृत घोषित केले. सदरील शेतकऱ्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाचा अचानक मृत्यू झाल्याने रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला होता. या घटनेची बातमी देईपर्यंत पोलिसात कोणतीही नोंद झालेली नव्हती. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/gt2PSvc

No comments:

Post a Comment