Breaking

Wednesday, August 17, 2022

सायकलिंग : निर्णयक क्षणी कुणाल महावीरने वेद केरकरवर बाजी मारत अव्वल स्थान पटकावले https://ift.tt/OgW3Bto

मुंबई : कस्टम पाॅईन्ट वे.सो. व मुंबई सिटी सायकलिंग असोसिएशन तर्फे गेली ४२ वर्ष सायकल स्पर्धा भरवण्यात येते, गेल्या दोन वर्षात करोना असल्या मुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती त्यामुळे यावर्षी जास्त जोशपूर्ण वातावरणात ही स्पर्धा पार पडली, या स्पर्धेमध्ये खुल्या गटामध्ये (स्वदेशी, गियरनसलेली)सायकल मास्टर २०२२ या किताबा साठी कुणाल महावीर आणि वेद केरकर या दोघा स्पर्धकांमध्ये अटीतटीची चुरस पहायला मिळाली पण निर्णायक क्षणी कुणाल महावीरने ही स्पर्धा जिंकत सायकल मास्तर २०२२ हा किताब मिळवला व वेद केरकर याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दोघांमध्ये फक्त एक सेकंदाचा फरक होता आणि या गटात निकेत पाटील तिसरा आला. गियर असलेल्या खुल्या गटात सिद्धार्थ दवंडे याने कुणाल महाविर याला विजेतेपदाची हुलकावणी देत प्रथम क्रमांक पटकावला कुणाल महाविर आणि भुमेश टाक याला अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे ४० वर्षावरील स्पर्धा. या स्पर्धेमध्ये पंकज मारलेशा या राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळेडूने प्रथम क्रमांक पटकावला. तर जितेंद्र कोकिटकर व मारीयन डिसुझा यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला. १) खुला पुरुष गटात प्रथम क्र - कुणाल महावीर द्वितीय क्र - वेद किरण केरकर तृतीय क्र - निकेत पाटील २) १८ वर्षांखालील सायकल शर्यतीतप्रथम क्र-ओमकार चव्हाण द्वितीय क्र-प्रांजल पाटील तृतीय क्र- देवरश्री पाटील ३)१० वर्षांखालील सायकल शर्यतीतप्रथम क्र- हनिष डुबारिया द्वितीय क्र- श्याम कुणाल यादव तृतीय क्र कौशिक मोरे ४)महिला सायकल शर्यतीतप्रथम क्र-निम श्रवण द्वितीय क्र -मिकाईला डिसोझा तृतीय क्र सिद्धी पोटे ५)खुला गट (गियर वाली सायकल) प्रथम क्र सिद्धार्थ दवंडे द्वितीय क्र कुणाल महावीर तृतीय क्र भूमेश टाक ६)प्रौढ गट सायकल शर्यतीतप्रथम क्र पंकज मारलेशा द्वितीय क्र जितेंद्र कोकिटकर तृतीय क्र मिरियन डिसुझा


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/J7KkQol

No comments:

Post a Comment