: दुपारची शाळा सुटल्यानंतर गावालगत असलेल्या खदानी मध्ये १६ वर्षीय मुलगा पोहण्यासाठी गेला. मात्र त्याचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परभणीच्या मानवत तालुक्यातील करंजी येथे ही हृदयद्रावक घडली आहे. नारायण दत्तराव बोरवट असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. (a school student who went for swimming has unfortunately died) नारायण दत्तराव बोरवट हा विद्यार्थी सोमवार १ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता शाळा सुटल्यानंतर गावालगतच्या खदानीत पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने नारायण हा पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी खदानीकडे धाव घेतली. तातडीने पाण्यात बुडालेल्या विद्यार्थ्यास वर काढुन ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश शिंदे यांनी तपासणी केली असता नारायण चोरवट यास मृत घोषीत केले. क्लिक करा आणि वाचा- नारायण हा विद्यासागर हायस्कुल या शाळेत शिक्षण घेत असून शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह झाल्याने त्याच्यावर काळाने घाला घातला. शाळेतील विद्यार्थी दुर्देवी घटनेत मयत झाला असल्याने शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून व करंजी ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, जिल्ह्यात सततच्या पावसामुळे सर्वत्र नदी, नाल्यांना पाणी खळखळून वाहत आहे. गावाशेजारी, शेतशिवारात मुरुम, दगड उत्खन्नन करण्यात आलेल्या खदानींमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या साचलेल्या पोहन पाण्यात पोहचण्याचा आनंद लुटण्यासाठी विद्यार्थी जाताना दिसून येत आहेत. यामुळे अशा घटना घडत असून पालक व शाळा व्यवस्थापनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/UpNLhxK
No comments:
Post a Comment