Breaking

Monday, August 29, 2022

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या त्या वक्तव्याचा होतोय जाहीर निषेध; शिवसैनिक म्हणतात माफी मागा https://ift.tt/TMClDYo

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता (Gulabrao Patil) यांनी काल एका कार्यक्रमात भाषण करताना महिला तसेच स्त्री रोगतज्ञ डॉक्टरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज शिवसेनेच्या वतीने मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिमा जाळण्यात येऊन तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. (the condemned the state water supply minister ) मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. स्त्रीरोग तज्ञ हे कधीच हातपाय बघत नाहीत. हातपाय बघणारे कधीच स्त्री रोगतज्ञ होऊ शकत नाहीत, असं वादग्रस्त वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमधील एका कार्यक्रमांमध्ये केलेले आहे. या वक्तव्यावरून शिवसेनेच्या वतीने सोमवारी जळगाव महापालिकेसमोर मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिमा जाळण्यात आले. तसेच प्रचंड घोषणाबाजी करत गुलाबराव पाटील यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. क्लिक करा आणि वाचा- यावेळी शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे, धरणगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष निलेश चौधरी यांचा मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.मंत्री गुलाबराव पाटील यांनी महिला तसेच स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचा अपमान केला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी महिलांची तसेच डॉक्टरांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. क्लिक करा आणि वाचा- एक महिला असल्याने मला लाज वाटत आहे, ज्यांना देव समजल जाते, अशा डॉक्टरांबद्दल मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासारख्या माणसाने असं वक्तव्य करणे त्यांना शोभत नाही, असे शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी मंगला बारी यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3FrAcSm

No comments:

Post a Comment