सांगली: डाळिंबाच्या शेतामध्ये गांजाची शेती सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार जत तालुक्यात उघडकीस आला आहे. पोलिसांनी छापा टाकून गांजाची शेती उध्वस्त केली आहे.एका शेतकऱ्यास अटक करत १३ लाख ४० हजार किंमतीचा १३३ किलो गांजा जप्त केला आहे. जत तालुक्यातील माणिकनाळ या ठिकाणी एका शेतकऱ्याने गांजा शेतीची लागवड केल्याची माहिती उमदी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने माणिकनाळ येथे जाऊन छापा टाकला. डाळिंबाच्या शेतीमध्ये गांजा शेती पिकवत असल्याचा समोर आले. वाचा- त्यावेळी पोलिसांना डाळिंब शेतात गांजा शेती पिकवण्यात आल्याचे समोर आले. ५ ते ७ फूट उंचीची ही गांज्याची झाडे होते. त्यानंतर पोलिसांनी बागेत असणारी सर्व गांज्याची झाडे उखडून काढत डाळिंब बागेतील गांजा शेती उद्धवस्त केली. या प्रकरणी महसिद्ध बगली यांना अटक केली आहे. तर या छाप्यात १३३ किलो वजनाची ७८ गांज्याची झाडे जप्त करण्यात आले असून,बाजारात १० हजार किलो दराने याची विक्री किंमत आहे.त्यानुसार एक लाख ४० हजार रुपयांचा हा गांजा आहे. वाचा- जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात गांजाची शेती करण्यात येत,यापूर्वी अनेक वेळा गांजा शेती उद्धवस्त देखील करण्यात आली आहे.तर पोलिसांच्याकडून कारवाई होत असली तरी गांजाची शेती लागवड ही अजूनही सुरूच आहे.शेजारी कर्नाटक राज्य असल्याने सीमेवर असणाऱ्या जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचा सुळसुळाट आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/DaJ3lUf
No comments:
Post a Comment