Breaking

Friday, September 2, 2022

अतिक्रमणाविरोधात तक्रारी करून तरुण कंटाळला, शेवटी उचलले धक्कादायक पाऊल https://ift.tt/02QKUlI

: भडगाव तालुक्यातील कजगाव येथील बसस्थानकासमोरील काढण्याबाबत अनेकवेळा तक्रारी करून, तसेत निवेदने देवून देखील कोणतीही कारवाई न होत असल्याने, तक्रारदार तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजता घडली. परंतु, सतर्क असलेल्या पोलिसांनी वेळीच तरुणाला ताब्यात घेतल्याने अनुचित प्रकार टळला आहे. (as no action was taken against the , finally the ) कजगाव येतील भूषण नामदेव पाटील हा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून गावातील बस स्टँडसमोर असलेल्या गावठाण गट क्रमांक- १३१ समोरचे अतिक्रमण काढण्यासाठी पाठपुरावा करत आहे. या संदर्भात त्याने अनेकदा निवेदने देऊन देखील स्थानिक ग्रामपंचायतीने कोणतीही कार्यवाही केली नाही. या संदर्भात कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आपण आत्मदहन करणार आहोत, असा इशाराही भूषण पाटील या तरुणाने दिलेला होता. क्लिक करा आणि वाचा- दिलेल्या तक्रारी, निवदेनाची कोणतीही दखल जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात नाही असे तरुणाच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलत शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास तक्रारदार भूषण पाटील याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वत:च्या अंगावर सोबत आणलेल्या कॅनमधून पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी वेळीच धाव घेतल्याने तरुणाच्या हातातील पेट्रोलची कॅन आणि आगपेटी हिसकावून पुढील अनर्थ टळला आहे. घडलेल्या या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोठा गोंधळ उडाला. ही घटना घडल्यानंतर परिसरात नागरिकांची एकच गर्दी झाली होती. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/UpReSAd

No comments:

Post a Comment