Breaking

Friday, September 16, 2022

मुंबईकरांनो उद्या लोकल प्रवास करताय; जाणून घ्या मेगाब्लॉकच्या वेळा https://ift.tt/2EJxjhG

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि ठाणे ते वाशी-नेरूळदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत काही फेऱ्या विलंबाने धावणार असून काही रद्द राहणार आहेत. मध्य रेल्वे (मुख्य मार्ग) स्थानक – सीएसएमटी ते विद्याविहार मार्ग – अप आणि डाऊन धीमा वेळ – सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ परिणाम – ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही विलंबाने धावणार आहेत. हार्बर रेल्वे स्थानक – ठाणे - वाशी/नेरूळ मार्ग – अप आणि डाऊन वेळ – सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० परिणाम – ब्लॉक वेळेत ठाणे ते वाशी-नेरूळ-पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. या वेळेत प्रवाशांना हार्बर आणि मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची मुभा असणार आहे. पश्चिम रेल्वे स्थानक – चर्चगेट ते मुंबई सेंट्रल मार्ग - अप आणि डाऊन जलद वेळ – सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ परिणाम – ब्लॉक काळात जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावरून धावणार आहेत. यामुळे काही फेऱ्या रद्द राहणार असून काही विलंबाने धावणार आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/r73D9hW

No comments:

Post a Comment