Breaking

Friday, September 16, 2022

राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर; जितेंद्र आव्हाड यांना बढती, पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी https://ift.tt/SWixyUO

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. ‘राष्ट्रवादी’ने सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड आणि नरेंद्र वर्मा यांना बढती देऊन त्यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली. राष्ट्रीय सचिव म्हणून हेमंत टकले, राजीव झा, सच्चिदानंद सिंह, ब्रीजमोहन श्रीवास्तव आणि राजेंद्र जैन यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे वैदर्भीय नेते प्रफुल पटेल यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांमध्ये डॉ. योगानंद शास्त्री, के. के. शर्मा, पी. पी. महंमद फैजल यांची, तर राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून वाय. पी. त्रिवेदी यांची नियुक्ती करण्यात आली. कायम सचिव म्हणून एस. आर. कोहली काम पाहणार आहेत. ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकारी समितीत २८ जण असून, यात शरद पवार, प्रफुल पटेल, टी. पी. पीतांबरम मास्टर, सुनील तटकरे, के. के. शर्मा, एस. आर. कोहली, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, अजित पवार, फौजिया खान, ए. के. ससिंद्रन, पी. सी. चाको, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, वाय. पी. त्रिवेदी, वंदना चव्हाण, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील, धीरज शर्मा, सोनिया दोहन, थॉमस के. थॉमस, दिलीप वळसे-पाटील, सलेंग संगमा, रामराजे नाईक निंबाळकर, मधुकर कुकडे आणि शिवाजीराव गर्जे यांचा समावेश आहे. याशिवाय प्रत्येक राज्याचे प्रदेशाध्यक्ष सदस्य म्हणून असतील. राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून मुंबईतील क्लाइड कॅस्ट्रो यांची नियुक्ती झाली. त्यांच्याकडे गोव्याचे निरीक्षक आणि समन्वयकाची जबाबदारीही देण्यात आली आहे. शब्बीर विद्रोही छत्तीसगडचे निरीक्षक व समन्वयक, मधुकर कुकडे यांच्याकडे मध्य प्रदेशची, धीरज शर्मा यांच्याकडे दिल्ली, तर सोनिया दहोन यांच्याकडे हरियाणाची जबाबदारी देण्यात आली आहे. नरेंद्र वर्मा यांना मीडिया प्रभारी व राष्ट्रीय प्रवक्ते नेमण्यात आले आहे, अशी माहिती पटेल यांनी दिली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/VCwgv0u

No comments:

Post a Comment