Breaking

Sunday, September 25, 2022

मुख्यमंत्री म्हणून सचिन पायलट नको, गेहलोत समर्थकांनी नवं नाव सुचवलं , तिढा सुटणार? https://ift.tt/5foKPbL

जयपूर : एकीकडे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची आहे. पक्षाच्या एक व्यक्ती एक पद या धोरणानुसार गेहलोत यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे, त्यामुळं अशोक गेहलोत यांच्या जागी यांची निवड होणार असल्याच्या चर्चानंतर गेहलोत समर्थक आमदार भडकले आहेत. ९२ आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे. सोनिया गांधी यांनी निरीक्षक मल्लिकार्जून खर्गे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. रात्र उलटली तरी चालेल तुम्ही राजकीय वादावर मार्ग काढा, अशा सूचना सोनिया गांधी यांनी दिल्या आहेत. काँग्रेस नेते मंत्री प्रताप खाचरियावास यांनी त्यांच्यासोबत ९२ आमदारांचं पाठबळ असल्याचं म्हटलं. आमच्या आमदारांची बैठक झाली आहे, नवा मुख्यमंत्री निवडताना आम्हाला विश्वासात घेतलं गेलं नसल्याचं ते म्हणाले. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी अशोक गेहलोत यांना फोन केला असता त्यांनी त्यांच्या हातून परिस्थिती निसटल्याचं म्हटलं. शांती धारिवाल आणि प्रतापसिंह खाचरियावास हे विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांच्या निवासस्थानावरुन निघाले असून अशोक गेहलोत यांच्या घरी निघाले आहेत. त्यापूर्वी काही वरिष्ठ नेते पोहोचले आहेत. अजय माकन, मल्लिकार्जून खर्गे, सचिन पायलट, रघू शर्मा हे अशोक गेहलोत यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. राजीनामा देण्याचा इशारा दिलेल्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली असल्याची माहिती मिळतेय. काँग्रेसचे सहयोगी राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी आम्ही आमचा निर्णय बदलणार नसल्याचं म्हटलं मात्र अशोक गेहलोत अध्यक्ष होणार असतील तर त्यांच्या जागी काँग्रेसला नवा मुख्यमंत्री निवडावा लागेल, असं ते म्हणाले. सीपी जोशी कोण आहेत? सीपी जोशी सध्या राजस्थानचे विधानसभा अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी भिलवाडा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून काम केलं आहे. ते मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील होते. रस्ते वाहतूक विकास मंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे. सरकारमध्ये देखील त्यांनी मंत्री म्हणून काम केलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/QSrT2DG

No comments:

Post a Comment