: 'डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याने आमच्या भावाचा मृत्यू झाला,' असा आरोप करून, ' या रुग्णालयावर कारवाई करून डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करावी', अशी मागणी करत मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी लातूर शहरातील आयकॉन हॉस्पिटलमधे गोंधळ घातला. त्यामुळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांनी नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र नातेवाईक आपल्या मागणीवर ठाम असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय. (The relatives of the patient have alleged that the patient died due to the negligence of the doctor) लातूर शहरातील जिल्हा परिषदच्या समोरील बाजूस आयकॉन हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमधे संतोष लातूरे दिनांक ४ सप्टेंबर रोजी किरकोळ आजार दाखवण्यासाठी गेले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना ॲडमिट होण्याचा सल्ला दिला. ते ॲडमिट झालेही मात्र त्यांची प्रकृती सुधारण्या ऐवजी खालावत गेली. अखेर त्यांच्यावर डायलासिस करण्याची वेळ आली. रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यालाही परवानगी दिली. दरम्यान, त्यांना रात्रीच्या वेळी काही औषधी आणण्यास डॉक्टरांनी सांगितले. मात्र आयकॉन हॉस्पिटलच्या औषधी दुकानात काम करणारे कर्मचारी झोपले असल्याने त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण ते न उठल्याने त्यांना औषध मिळू शकले नाही. त्यामुळे अखेर त्यांनी बाहेरील औषधी दुकानातून डॉक्टरांना औषध आणून दिले मात्र,' मी बाहेरून आणलेल्या औषधांचा वापर माझ्या रुग्णांसाठी करत नाही', असे डॉक्टरांनी संतोष लातूरे यांच्या नातेवाईकांना सांगितले. 'तुमच्या हॉस्पिटल मधील औषधी दुकानातील कर्मचारी झोपेतून उठत नाहीत आणि औषध देत नाहीत', " असे सांगितल्यानंतरही डॉक्टरांनी बाहेरून आणलेले औषध घेण्यास नकार दिला आणि संतोष लातूरे यांचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू झाला " असे सांगत संतोष लातूरे यांच्या बंधने रुग्णालय आणि डॉक्टर अन्वर हलगर्जीपणा करत आपल्या भावाला मारल्याचा आरोप केला आहे. या संबंधी त्याने रुग्णालय आणि संबंधित सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रारही दिली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचली असून नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र रुग्णाच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मयत रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णहक्क संरक्षण समितीचा पाठिंबा दरम्यान, रुग्ण हक्क संरक्षण समितीचे प्रमुख ॲड. निलेश करमुडी यांनीही रुग्णालय प्रशासना विरोधात आणि डॉक्टरांनी विरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ykzPLWU
No comments:
Post a Comment