Breaking

Saturday, September 10, 2022

डॉक्टरांना सलाम! महिलेच्या पोटात होती फुटबॉलएवढी गाठ, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत मोठे यश https://ift.tt/SAV3Np8

नवी दिल्ली: दिल्लीतील सीके बिर्ला रुग्णालयातील एक शस्त्रक्रिया सध्या चर्चे आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर येथील डॉक्टरांचे कौतुक करण्यात येत आहे. शस्त्रक्रियाही तशीच होती. या रुग्णालयात पोटदुखीने त्रस्त असलेल्या एका महिलेवर शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून काढण्यात आली. या ३२ वर्षीय रुग्ण महिलेच्या पोटात ही किलो वजनाची गाठ होती. (doctors removed a from the woman stomach) ही महिला मूळची नेपाळची आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या पोटात दुखत होते. त्यानंतर तिला सीके बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या पोटात ४ किलो इतक्या वजनाची आणि ४० सेमी इतक्या व्यासाची गाठ तपासणीदरम्यान आढळून आली. क्लिक करा आणि वाचा- त्यानंतर या महिलेवर शस्त्रक्रिया करून ती गाठ काढून टाकण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. त्यानंतर डॉक्टरांनी कीहोल लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे ही गाठ काढली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून रुग्णाला कोणताही त्रास झाला नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच ही गाठ काढून टाकल्यानंतर महिलेला होणार त्रास बंद झाला, असेही डॉक्टरांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- या महिलेवर सीके बिर्ला रुग्णालयाचे डॉक्टर अमित जावेद यांनी ही शस्त्रक्रिया केली. महिलेच्या पोटातील गाठीचा आकार मोठा असल्याने शस्त्रक्रिया करणे कठीण होते. ती गाठ पोटाच्या पोकळीत पसरली होती. या मुले शस्त्रक्रिया करण्यासाठी पोटात पुरेशी जागा देखील नव्हती, असे डॉ. जावेद म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- या गाठीचा आकार मोठा असल्याने लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे गाठ कापणेही सोपे नव्हते. मात्र ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून आता रुग्ण पूर्णपणे बरा झाला असल्याचेही डॉ. अमित जावेद म्हणाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/0DCx3t4

No comments:

Post a Comment