Breaking

Tuesday, September 27, 2022

जेसीबीद्वारे जुनं आरसीसी शेड पाडताना भिंत कोसळली, चिमुकले जखमी https://ift.tt/bFVd19n

ठाणे : भिवंडीतील सांस्कृतिक केंद्राच्या आवारात असलेले जुने आरसीसी शेड जेसीबीद्वारे पाडण्याचे काम चालू असताना अचानक शेड भोवतालची भिंत कोसळून दोन लहान मुलांसह सहा जण जखमी झाले. ही दुर्घटना मंगळवारी सायंकाळी भिवंडीतील प्रभाग क्रमांक १० मधील चव्हाण कॉलनीमध्ये घडली. अलिशा (३५), नाझिया शेख (१७), निझामुद्दीन अन्सारी (६०), फैजान (९), झैनब अझहर खान (४), ईनाबी शेख (७०) अशी या जखमींची नावे आहेत. चव्हाण कॉलनीमध्ये असलेल्या के.जी.एन. सांस्कृतिक केंद्राच्या आवारात एक बैठे आरसीसी शेड आहे. या शेडच्या कॉलम, बीम, स्लॅबला तडे पडून भेगा पडलेल्या आहेत. तसेच हे शेड मोडकळीस आले आहे. त्यामुळे शेड तोडून त्याठिकाणी लोखंडी स्ट्रक्चरल स्टील आणि ॲल्युमिनीअम प्रोफाईल पत्र्याचे नवीन शेड उभारण्यात येणार आहे. दरम्यान, मंगळवारी काही अज्ञाताकडून शेड जेसीबीद्वारे पाडण्याचे काम करताना या शेड भोवतालची भिंत कोसळून लगतच्या घरातील रहिवाशी जखमी झाले, अशी माहिती भिवंडी महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. या दुर्घटनेमध्ये एकूण सहा जण जखमी झाले असून या सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आरसीसी शेड पाडताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2PW0FTf

No comments:

Post a Comment