तिरुवअनंतपुरम : रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील टीम इडियांनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा टी-२० मालिकेत २-१ असा पराभव केला. ऑस्ट्रेलियानं पहिला सामना जिंकत विजयी सलामी दिली होती. मालिकेतील दुसऱ्या सामन्यावर पावसाचं सावट निर्माण झालं होतं, मात्र ८ षटकांचा सामना झाला त्यात टीम इंडियानं विजय मिळवला, हैदराबादमध्ये झालेल्या तिसऱ्या टी-२० मालिकेत २० व्या ओव्हरमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेला भिडणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला आहे. उद्यापासून दक्षिण आफ्रिकेच्या विरोधातील टी-२० मालिकेला २८ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना केरळच्या तिरुवअनंतपुरममध्ये होणार आहे. केरळमध्ये टी-२० सामन्यासाठी दोन्ही टीम दाखल झाल्या आहेत. तिरुवअनंतपुरममध्ये ग्रीनफील्ड मैदानाबाहेर ऑल केरळ रोहित शर्मा फॅन्स असोसिएशननं टीम इंडियाच्या कॅप्टनला अनोख गिफ्ट दिलं आहे. रोहित शर्माच्या स्वागतासाठी भला मोठा फ्लेक्स उद्या (२८ सप्टेंबर) टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेला २८ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियासाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. कर्णधार रोहित शर्मा याच्या स्वागतासाठी केरळच्या त्याच्या चाहत्यांनी त्याला अनोखं गिफ्ट दिलं आहे. तिरुवअनंतपुरमच्या ग्रीन फिल्ड मैदानाबाहेर रोहित शर्माच्या स्वागतासाठी भला मोठा फ्लेक्स बोर्ड लावण्यात आला आहे. मुंबई इंडियन्स देखील त्या फ्लेक्सचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.रोहित शर्माचा फोटो ट्विट करत त्यांनी वेलकम टू केरळ रोहित, असं कॅप्शन दिलं आहे. टीम इंडियासाठी ही मालिका महत्त्वाची टीम इंडियानं टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचं विजेतेपद सर्वात पहिल्यांदा पटकवलं होतं. त्यानंतर टी-२० विश्वकप स्पर्धेत टीम इंडियाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणारी मालिका टी इंडियासाठी महत्त्वाची आहे. भारत विरूध्द साऊथ आफ्रिका टी-२० मालिका पहिला टी-२० सामना - २८ सप्टेंबर, ७ वाजता (तिरूवअनंतपुरम) दुसरा टी-२० सामना - २ ऑक्टोबर, ७ वाजता (गुवाहाटी) तिसरा टी-२० सामना - २ ऑक्टोबर, ७ वाजता (इंदूर) भारत विरूध्द साऊथ आफ्रिका एकदिवसीय मालिका पहिली वनडे: ६ ऑक्टोबर, लखनऊ, दुपारी १.३० वाजता दुसरी वनडे: ९ ऑक्टोबर, रांची, दुपारी १.३० वाजता तिसरी वनडे: ११ ऑक्टोबर, दिल्ली, दुपारी १.३० वाजता
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/u7olL6B
No comments:
Post a Comment