Breaking

Wednesday, September 7, 2022

तानाजी सावंत हेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते, पुढे मुख्यमंत्री होऊ दे; तुळजा भवानीला साकडे https://ift.tt/EnXk2Vq

: आरोग्यमंत्री डॉ. (Health Minister Tanaji Sawant) हे लवकर मुख्यमंत्री होऊ दे, असे साकडे कार्यकर्त्यानी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत आई तुळजा भवानीला घातले आहे. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी स्मितहास्य करत कार्यकर्त्यांच्या या भावनेला मुकसंमत्ती दिली. कार्यकर्त्यांनी साकडे घातल्यानंतर देवीची महाआरती करण्यात आली. (Activists prayed to Tulja Bhavani to let Health Minister become the Chief Minister) आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्हयाचा धावता दौरा केला. आपला दौरा आटोपल्यानंतर ते शेवटी तुळजा भवानीच्या दर्शनासाठी आले. या वेळी कार्यकर्त्यानी उत्साहात आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत लवकरच मुख्यमंत्री होऊ दे असे साकडे घातले. या वेळी मंत्री तानाजी सावंत यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. क्लिक करा आणि वाचा- आई अंबामाय जगदंबे तू तानाजी सावंत साहेबांना कॅबिनेट मंत्रीपद दिलेस. ते खरोखरच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते. आता पुढे त्यांना मुख्यमंत्री होऊ दे, असा आर्शिवाद दे, असे साकडे तुळजा भवानीला कार्यकर्त्यांनी घातले. मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या कपाळी हळदी कुंकवाचा मळवट लावून कार्यकर्त्यांनी हे साकड घातले आहे. क्लिक करा आणि वाचा- आरोग्यमंत्री डाँ तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्हयाचा धावता दौरा केला. शेवटच्या टप्यात रात्री उशिरा तुळजापुरात तुळजा भवानीच्या दर्शनासाठी मंत्री तानाजी सावंत दाखल झाले होते. मंत्री डॉ. तनाजी सावंत यांच्या हस्ते तुळजा भवानीच्या माँ जिजाऊ महाद्वाराच्या पायरीवरच महाआरती करण्यात आली. या नंतर गणपतीची आरती करुन मंत्री डॉ. तानाजी सावंत हे सोलापूरमार्गे पुण्याला रवाना झाले. क्लिक करा आणि वाचा- या वेळी कार्यकर्त्यानी उत्सहात आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे स्वागत केले. आरोग्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी असंख्य कार्यकर्त्यानी हजेरी लावली होती. या वेळी मंत्री डाँ तानाजी सावंत यांनी माध्यमांना बोलायचे मात्र टाळले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/nDlj1zZ

No comments:

Post a Comment