Breaking

Saturday, September 17, 2022

भाजपचे भूपेंद्र यादव बुलढाण्यात दोन दिवस तळ ठोकणार, प्रतापराव जाधवांचं टेन्शन वाढणार? https://ift.tt/FSl17co

बुलढाणा: लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या भाजपच्या 'मिशन- ४५' मध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघ अग्रक्रमावर आहे. इथं पुढचा खासदार भाजपचा असेल असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केला होता. प्रभारी रावसाहेब दानवे, खासदार अनिल बोंडे यांनी याचा बुलढाण्यात पुनरुच्चार केला होता. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय श्रम, रोजगार,वन मंत्री भूपेंद्र यादव हे उद्या पासून मतदारसंघात दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहे. यामुळे शिंदे गटाची धाकधूक वाढल्याचे चित्र आहे.पहिल्या टप्प्यात ते ( १८ व १९ सप्टेंबर) खामगाव व जळगाव विधानसभा मतदारसंघात ते जवळपास पूर्णवेळ हजेरी लावणार आहेत. १८ ला खामगाव तर १९ तारखेला जळगाव जामोद मतदारसंघ असा भूपेंद्र यादव यांचा दौरा आहे. खामगावचे आमदार आकाश फुंडकर व जळगाव जामोदचे आमदार डाँ.संजय कुटे हे त्यांच्या सोबत असणार आहेत. १८ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा सात वाजता औरंगाबाद विमानतळावर आगमन झाल्यावर शासकीय वाहनाने देऊळगाव राजा येथे ते दाखल होतील. भूपेंद्र यादव हिवरखेड येथील राष्ट्रीय प्रकल्पाला भेट देऊन ते पावणेदहा वाजता खामगावच्या ऐतिहासिक टिळक राष्ट्रीय विद्यालयाला ते भेट देणार आहेत. जनसंघाच्या कार्यकर्त्यांशी संवाद ते साधणार आहेत. खामगाव मतदारसंघातील विविध संघटना, पदाधिकारी यांच्या ते भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करतील. भूपेंद्र यादव रात्री आठ वाजता शासकीय विश्रामगृह शेगाव येथे स्थानिक पत्रकारांसोबत संवाद साधतील. नऊ वाजता भाजपाच्या आय.टी.सेल,सोशल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. भूपेंद्र यादव १९ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता माध्यमांसोबत शासकीय विश्रामगृह शेगाव येथे संवाद साधतील. संत श्री गजानन महाराज मंदिराला ते भेट देणार असून नऊ वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील विहिरीला भेट देणार आहेत. भपेंद्र यादव यानंतर विविध कार्यक्रमाला उपस्थिती लावतील. जळगाव जामोद येथे "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" यानिमित्त शहरातून काढण्यात येणाऱ्या बाईक रॅलीत केंद्रीय मंत्र्याचा सहभागी होणार आहेत. भाजपा महिला मोर्चाच्या प्रतिनिधी, सेवा सप्ताहाचे शुभारंभ, समाजातील दुर्बल घटकांसोबत बैठक घेतली. यानंतर जळगाव जामोद वरून बुलढाणा येथे जातील. तिथे मलकापूर रोडवरील भाजपा जिल्हा कार्यकर्त्यांच्या नियोजित जागेला ते भेट देणार आहेत. भूपेंद्र यादव नियोजित भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करतील.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/9U05RzW

No comments:

Post a Comment