Breaking

Sunday, September 18, 2022

उद्धव ठाकरे, तुम्ही महाराष्ट्रातील जनतेशी गद्दारी केलीत; रामदास कदमांची घणाघाती टीका https://ift.tt/hYOd8ry

रत्नागिरी : शिवसेनाप्रमुखांनी जे कमावले ते (Uddhav Thackeray) यांनी घालवले. उद्धव ठाकरे, तुम्ही महाराष्ट्रातील जनतेशी गद्दारी केली आहे, असा घणाघाती आरोप एकनाथ शिंदे () गटात गेलेले माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी जाहीर सभेत केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाऊ नका, असे त्यांना सांगितले पण त्यांनी ऐकले नाही. एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी फसवले याचा मी साक्षीदार आहे, असा आरोप रामदास कदम यांनी दापोली येथील आझाद मैदानात झालेल्या जाहीर सभेत बोलताना केला. (former minister criticizes and ) यावेळी व्यासपीठावर आमदार भरत गोगावले, आमदार योगेश कदम,माजी आमदार अशोक पाटील, दीप्ती निखार्गे भाजपचे केदार साठे, मकरंद म्हादलेकर, विजय जाधव, प्रदिप सुर्वे, निलेश शेठ, आदी दापोली, खेड, मंडणगड येथील पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. क्लिक करा आणि वाचा- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि यांच्यावर घणाघाती टीका करताना रामदास कदम पुढे म्हणाले की, अरे गद्दार कोण? आदित्य तू गद्दार आहेस, मला संपवण्यासाठी कारस्थान रचलेस, असा एकेरी उल्लेख करत रामदास कदम यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरेंवर आरोप केला. मंत्रालयात अडीच वर्षात गेलात सगळ्यांवर अन्याय केलात. उद्धव ठाकरे तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी केलीत, असा घणाघाती आरोप रामदास कदम यांनी दापोलीत केला. पर्यावरण मंत्री असताना प्लास्टिक बंदी आपण केली आणि त्याचे श्रेय घेण्यासाठी आदित्य ठाकरे पुढे येत होता, असाही आरोप आदित्य ठाकरे यांच्यावर केला. क्लिक करा आणि वाचा- लवकरच चिपळूण गुहागरमध्येही माझ्या सभा होणार आहेत आणि आता माझ्या नादाला लागणाऱ्या सोंगड्या बाटग्या आमदार भास्कर जाधवला मी घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असे थेट आव्हान रामदास कदम यांनी या सभेत दिले. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/TpH51sf

No comments:

Post a Comment