Breaking

Monday, September 19, 2022

वासुंद्री गावात भयानक जळीतकांड, महिलेसह दोन मुलींना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, महिलेने असा केला मुलीसह स्वत:चा बचाव https://ift.tt/IqkgeNd

: कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील टिटवाळ्याजवळ असलेल्या वासुंद्री गावात जळीतकांडाचा भयानक प्रकार घडला. वासुंद्री रोडला असलेल्या नारायण निवासमध्ये राहणाऱ्या एका आणि तिच्या दोन लहान मुलींना घरात बंदिस्त करुन तिच्या घरावर पेट्रोल ओतून त्यांना घरात जिवंत जाळण्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला. या घराच्या आजुबाजूला असलेल्या रहिवाशांच्या घरांना हल्लेखोरांनी कड्या लावल्या होत्या. त्यामुळे हे सर्व रहिवासी घरात कोंडून राहिले होते. मात्र तरीही या महिलेने प्रसंगावधान राखून आपल्या मुलींसह स्वतःचा बचाव केला. (A happened to a and a girl in near ) या महिलेने बंदिस्त घरातून ओरडाओरडा केल्यानंतर परिसरातील रहिवासी रात्री दीड वाजता जागे झाले. त्यांना योगेश पाटील यांच्या घराला आणि घरासमोरील रिक्षाला आग लागल्याचे लक्षात आले. रहिवाशांनी घराच्या दरवाजाला बाहेरून लावलेली कडी काढून महिलेसह तिच्या दोन्ही मुलींना सुखरुप बाहेर काढले. मात्र तत्पूर्वी ही महिला आणि तिच्या आठ आणि दोन वर्षाच्या मुली धुराने कोंडून गुदमरल्या होत्या. शेजारील घरांच्या दरवाजांना बाहेरुन कड्या लावण्यात आल्याने तेही रहिवासी घराबाहेर पडणार नाहीत, अशी व्यवस्था हल्लेखोरांनी केली होती. योगेश पाटील (३६ वर्षे) हे टिटवाळ्यातील वासुंद्री रोडला असलेल्या नारायण निवासमध्ये पत्नी दीपाली, आराध्या (८ वर्षे) आणि क्रिशा (२.६ वर्षे) या दोन मुलींसह राहतात. योगेश हे शहाड येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीत नोकरी करतात. योगेश आणि मांडा गावातील लालचंद पाटील, बबलेश पाटील, नरेश पाटील, आशीष पाटील यांच्यात जमिनीवरून वाद सुरू आहेत. आठ वर्षांपूर्वी पाटील बंधूंनी योगेशला मारहाण केली होती. तेव्हापासून त्यांच्यात धुसफूस सुरू आहे. बुधवारी योगेश रात्रपाळी कामासाठी कंपनीत गेले. घरी पत्नी व दोन लहान मुली होत्या. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घराच्या खिडकीजवळ बोलण्याचा आवाज आला. त्यावेळी योगेश यांची पत्नी दीपाली हिने प्रसंगावधान राखून घरातील लाईट बंद केल्या. खिडकीतून आरोपी लालचंद, बबलेश, नरेश, आशिष हे तेथून हातात ड्रम, बोळे घेऊन पळताना दीपाली हिने पाहिले. आरोपींनी जमिनीच्या वादातून योगेश यांच्यावर राग काढण्यासाठी घरावर पेट्रोल टाकून त्यांच्या कुटुंबीयांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात घरातील सामान जळाले. तर घरासमोरील योगेश यांची एम एच 05/ डी क्यू/ 4026 क्रमांकाची रिक्षा जाळून टाकण्यात आली. जमिनीच्या वादातून आपल्या कुटुंबीयांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याबद्दल योगेश यांनी आरोपींच्या विरुध्द तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पंचनामा करून योगेश पाटील यांच्या जबानीवरून भादंवि कलम 440, 34 अन्वये गुन्हा दाखल केला. या घरातील सोफा, पडदे, वायर, २ फॅन, लाईट्स, बोर्ड, टीव्हीसह रिक्षा असे ६५ हजार रुपये किंमतीचे सामान जळून खाक झाले. या प्रकरणी पोलिस निरीक्षक दिलीप देशमुख अधिक तपास करत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/21LRtC8

No comments:

Post a Comment