: जालन्यातील शासकीय महिला आणि बाल रुग्णालयात पाठीच्या कण्यातील विकाराने त्रस्त असलेल्या एका महिलेची यशस्वी करण्यात आली आहे. तब्बल १७ डॉक्टरांनी केलेल्या या प्रसूतीला यश आलं आहे. प्रसूती पूर्णपणे यशस्वी झाल्यानं महिलेसह बाळाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. (a team of 17 doctors performed a of a woman in jalna) जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील २१ वर्षीय गोदा गुडेकर यांना शुक्रवारी सकाळी जालन्यातील महिला आणि बाल रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. पण या महिलेला कायपोस्कोलिओ हा आजार आहे. हा आजार असल्यानं गोदा यांचा पाठीचा मणका हा वाकडा आहे. शिवाय गर्भाशयात बाळाला आवश्यक तेवढी जागा मिळाली नाही. त्यामुळे अशा रुग्णांची प्रसूती करणं डॉक्टरांसमोर मोठं आव्हान असतं. शिवाय प्रसूतीसाठी आलेल्या महिलांच्या शरीरात प्लेटलेटही फक्त ७२ हजार इतक्याच असल्यानं प्रसूती नॉर्मल आणि सीझर करणं शिवाय भूल देणं देखील एक आव्हान बनलं होतं. क्लिक करा आणि वाचा- त्यामुळे डॉक्टरांना या सर्व प्रक्रियेसाठी दोन तास लागले. अखेर उपस्थित १७ तज्ञ डॉक्टरांच्या टीमने थ्री इडियट सिनेमात ज्या प्रकारे व्हॅक्यूमच्या थिअरीने रांचो, प्रिया व त्यांची टीम प्रसूती पार पाडतात त्याच स्टाईलने जालन्यातील या डॉक्टरांच्या टीमने मेहनतीने व्हॅक्यूअम पद्धतीने प्रसूती केल्यानं महिलेच्या नाते वाईकांनी सुटकेचा निश्वास टाकला. क्लिक करा आणि वाचा- प्रसूती झालेल्या महिलेसह बाळाची प्रकृती ठणठणीत म्हणजे all is well असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. डॉक्टरांच्या या कामगिरीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/RgNcniL
No comments:
Post a Comment