Breaking

Sunday, September 11, 2022

आतापर्यंत जे घडलं नव्हतं ते श्रीलंकेने फक्त या सामन्यात करून दाखवलं, सर्वांना दिला मोठा धक्का https://ift.tt/kJ5GAH2

दुबई : श्रीलंकेच्या संघाने आतापर्यंत जे घडलं नव्हतं ते फक्त या एका सामन्यात करून दाखवलं आहे. त्याचबरोबर श्रीलंकेच्या संघाने सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. कारण या सामन्यापूर्वी श्रीलंकेचा संघ हा सामना हरणार, असे म्हटले जात होते आणि त्याच्यामध्ये तशी पार्श्वभूमीही होती. श्रीलंकेचा सघ या सामन्यासाठी फेव्हरेट समजला जात नव्हता. कारण पाकिस्तानच्या संघाचे पारडे जड समजले जात होते. कारण या संपूर्ण वर्षभरात श्रीलंकेच्या संघाला धावांचा पाठलाग करताना एकही सामना जिंकता आला नव्हता. या वर्षात श्रीलंकेचा संघ तब्बल सात वेळा प्रथम फलंदाजी करून धावांचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरला होता. पण सातपैकी एकदाही त्यांना यश मिळालं नव्हतं. त्याचबरोबर आजच्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने टॉस गमावला होता. या स्पर्धेत ज्या संघाने टॉस गमावला त्यांना विजय मिळवता आला नव्हता. कारण प्रत्येक संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारली होती आणि त्यांना सामना जिंकण्यात यश मिळालं होतं. त्यामुळे आजचा सामना श्रीलंका जिंकेल, असे बऱ्याच जणांना वाटत नव्हते. पण श्रीलंकेच्या संघाने यावेळी कमाल केली. पाच विकेट्स गेल्यावरही भानुका मैदानात उभा राहीला आणि त्याने अर्धशतक झळकावले. त्याचबरोबर श्रीलंकेच्या गोलंदाजांनीही अचूक आणि भेदक कामगिरी केली. श्रीलंकेच्या वानिंडू हसरंगाने यावेळी एकाच षटकात तीन बळी मिळवले आणि सामना श्रीलंकेच्या बाजूने फिरला. सामन्याच्या १७ व्या षटकात श्रीलंकेच्या संघाने एक खेळी केली आणि त्याचाच फायदा त्यांना झाला. ही गोष्ट घडली ती १७व्या षटकात. त्यावेळी मोहम्मद हा चांगल्या फॉर्मात दिसत होता. त्यावेळी श्रीलंकेच्या कर्णधाराने चेंडू वानिंडू हसरंगाच्या हातामध्ये दिला. हसरंगाने यावेळी मोहम्मद रिझवानला पहिल्याच चेंडूवर बाद केले आणि त्यांनी पाकिस्तानला मोठा धक्का दिला. कारण रिझवान हा श्रीलंकेच्या विजयातील मोठा अडसर ठरत होता. हसरंगा फक्त एवढ्यावर थांबला नाही तर त्याने तिसऱ्या चेंडूवर आसिफ अलीला बाद केले आणि पाकिस्तानला अजून एक धक्का दिला. त्यानंतर या षटकाच्या पाचव्या चेंडूवर खुशदिल शाहला बाद केले आणि एकाच षटकात त्याने तीन विकेट्स घेतले आणि हे एकच षटक श्रीलंकेसाठी टर्निंग पॉइंट ठरल्याचे पाहायला मिळाले. या एकमेव गोष्टीच्या जोरावर सामना श्रीलंकेच्या बाजूमे फिरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे हे एक षटक पाकिस्तानला सामना जिंकवण्यापासून दूर घेऊन गेल्याचे पाहायला मिळाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/NgP3JTE

No comments:

Post a Comment